Maharashtra Breaking News LIVE : प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे गेल कंपनी विरोधात आंदोलन
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

धाराशिवच्या उमरगा तालुक्यात ग्रामसेवकाचा बनावट शिक्का तयार करून अनेकजण विविध योजनांचा लाभ घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड. उमरगा तालुक्यातील सावळसूर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ग्रामसेवकाचा बनावट सही शिक्का वापरून बांधकाम कामगार प्रमाणपत्राचे केले जात आहे वाटप. साळसूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने पोलिसात तक्रार दिली. ग्रामसेवकाच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता. उमरगा तालुक्यातील सावळसूर ग्रामपंचायतचा बनावट शिक्का वापरुन लातूर जिल्ह्यातील कामगारांना दिले जात आहे बांधकाम कामगारांचे बोगस प्रमाणपत्र. बनावट सही शिक्क्याची प्रमाणपत्र आढळल्याने उमरगा तालुक्यात एकच खळबळ. भोकरदन तालुक्यातील पारध येथे काल सायंकाळच्या सुमारास आणि मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर अधिक असल्याने जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पाणी साचल्यामुळे काही काळ तळ्याचे स्वरूप आलं होतं त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ देखील उडाली होती.
LIVE NEWS & UPDATES
-
अजित पवार यांच्या उपस्थितीत आभार मेळाव्याचं आयोजन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील विजयाबद्दल आभार मेळाव्याचे आयोजन
बारामतीमधील माळेगाव येथील शिवतीर्थ मंगलकार्यालय येथे होणार आभार मेळाव्याचे आयोजन.
उद्या दुपारी 1.30 वाजता आभार मेळाव्याचे आयोजन.
मेळाव्याला शेतकरी सभासद आणि कामगारांना जास्तीत जास्त उपस्थित राहण्याचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांचे आवाहन.
-
गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 13 कोरोनाबाधितांची नोंद
गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 13 कोरोनाबाधितांची नोंद
कोविडने राज्यात आज एका रुग्णाचा मृत्यू
मृत्यू झालेला रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील 65 वर्षीय महिला
राज्यात सध्या 148 सक्रिय रुग्ण
-
-
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाल्याचा आनंद – राजनाथ सिंह
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी आनंद व्यक्त केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एससीओ शिखर परिषदेत चीनच्या संरक्षण मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. त्यानंतर, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
-
अहमदाबाद: जगन्नाथ रथयात्रेदरम्यान एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेला
अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेला. यानंतर लगेचच वन विभागाचे एक पथक हत्तीला नियंत्रित करण्यासाठी पोहोचले.
-
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणचे उपपरराष्ट्र मंत्री अराघची यांच्याशी केली चर्चा
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज दुपारी इराणचे उपपरराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांच्याशी चर्चा केली. या संभाषणादरम्यान, जयशंकर यांनी सध्याच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीवर इराणचे विचार आणि दृष्टिकोन मांडल्याबद्दल अरघची यांचे आभार मानले. भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात मदत करण्यात इराणने घेतलेल्या भूमिकेबद्दल एस जयशंकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले.
-
-
उदय सामंत यांचा शरद पवार गटाचे नेते प्रशांत यादव यांच्यासोबत एकत्र प्रवास
प्रशांत यादव आणि उदय सामंत यांच्यामधील मैत्री दिवसेंदिवस आणखी दृढ होत चालली आहे. प्रशांत यादव यांची भेट मागील आठवढ्यात उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी घेतली होती. त्यानंतर उदय सामंत यांनी प्रशांत यादव यांच्या वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाला भेट दिली. यानंतर पुढील दौऱ्यासाठी जात असताना प्रशांत यादव यांना सामंत यानी आपल्या गाडीत घेतले.
-
गेल कंपनीत कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करा, स्थानिक नागरिक-प्रकल्पग्रस्तांची मागणी
रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यात नव्याने सुरू झालेल्या गेल कंपनी विरोधात संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीने 25 जून पासून आंदोलन सुरू केलं आहे. स्थानिक नागरिक आणि प्रकल्पग्रस्त यांनी गेल कंपनीत कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करण्यासाठी मागणी केली आहे. मात्र या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी अद्यापही नोकरीत समाविष्ट करत नाहीय. त्यामुळे संतप्त स्थानिकांनी संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीला सोबत घेऊन हा लढा सुरू ठेवला आहे. त्यामुळे गेल कंपनी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
चोरीच्या 6 मोठ्या ट्रकसह दोन आंतरराज्यीय चोरांना अटक
वनराई पोलिसांनी चोरीच्या 6 मोठ्या ट्रकसह दोन आंतरराज्यीय चोरांना अटक केली. या ट्रकची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे. वनराई पोलीस ठाण्याबाहेर उभे असलेले हे सर्व मोठे ट्रक चोरीला गेले होते. पोलिसांनी गुजरात आणि राजस्थानमधून जप्त करून मुंबईत आणले आहेत.
-
स्वारगेट शिवशाही अत्याचार प्रकरण, जामीन अर्जावर सुनावणी पडली पार
स्वारगेट शिवशाही अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली आहे. आज निकाल येण्याची शक्यता होती. मात्र आता सोमवारी ऑर्डर होईल अशी माहिती वकिलांनी दिली आहे.
-
चिपळूण संगमेश्वर तालुक्यात भात शेती लावणीला सुरुवात
पावसाने मागिल 3 दिवसापासून उसंत घेतल्यामुळं शेतलावणीसाठी योग्य वातावरण निर्माण झाले आहे. सावर्डे आणि आरवली या भागात मोठया प्रमाणात भात शेतीलावणीला सुरुवात झाली आहे.
-
महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी घेतला जलवाहतुकीचा आढावा
अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक आणि वाहनांची वर्दळ होत असते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर समुद्रमार्गे जलवाहतूक हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. विरार – सफाळे दरम्यान जलमार्गाने प्रवासी आणि मालवाहतूक सुरु केल्यास महामार्गावरील ताण कमी होऊ शकतो. तसेच वेळ आणि इंधन वाचविले जाऊ शकतो. या संदर्भात तांत्रिक अहवाल तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, बंदर विभाग व इतर तज्ज्ञ संस्थांच्या सहकार्याने पुढील पावले उचलण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले
-
भारतीय संविधानातून ‘समाजवादी’ व ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द काढून टाकावेत- दत्तात्रेय होसबाळे
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिली आणि एकमेव आणीबाणी लागू करण्याला नुकतीच (२५ जून) ५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्त भारतीय जनता पार्टीने २५ जून हा काळा दिवस म्हणून पाळला. यात भाजपाची मातृसंस्था आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) देखील सहभागी होती. या आणीबाणीबद्दल बोलताना आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतून ‘समाजवादी’ व ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द काढून टाकण्याबद्दल विचार करण्याची मागणी केली आहे.
-
भाजपच्या राज्य अध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती
भाजपच्या राज्य अध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी किरेन रिजिजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय निवडणूक प्रक्रियेत राज्य अध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी तीन राज्यांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्री श्री. किरेन रिजिजू यांची, उत्तराखंडसाठी केंद्रीय राज्य मंत्री श्री. हर्ष मल्होत्रा यांची, तर पश्चिम बंगालसाठी श्री. रविशंकर प्रसाद यांची निवड करण्यात आली आहे.
-
मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील गावं अंधारात
वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाशिमच्या रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी, अंचळ, तपोवन, जायखेडा गावं अंधारात असल्याचं चित्र आहे. परिसरात विद्युत वाहिनीचे खांब कोसळल्याने तब्बल 24 तासांपासून गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, आणि शाळांची कार्यप्रणाली देखील ठप्प झाली आहे.
-
150 कोटींच्या जागेमुळे संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरची चौकशी
150 कोटींच्या जागेमुळे संदीपान भुमरेंचा ड्रायव्हर अडचणीत आलेला आहे. संदीपान भुमरेंचा ड्रायव्हरची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. ही जागा त्या ड्रायव्हरला हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाच्या वारसदाराकडून जागा गिफ्ट मिळाली असल्याचं त्याने सांगितलं. याची चौकशी आता सुरु आहे.
-
5 जुलैला ठाकरे बंधुंचा एकत्रित मोर्चा, हिंदीच्या मुद्द्यावरून येणार एकत्र
हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार असल्याचं म्हटलं जातं आहे. 5 जुलैला ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा काढणार आहे. एवढंच नाही तर संजय राऊतांकडून ठाकरे बंधुंचा फोटोही ट्वीट करण्यात आला आहे.
-
बीडच्या हॉटेलमध्ये गॅसच्या टाकीचा स्फोट, कुठलीही जीवितहानी नाही
बीड शहरातील मुख्य रस्ता असलेल्या नगर रोडवरील पोलीस अधीक्षक पेट्रोल पंपासमोरील एका साउथ इंडियन हॉटेलमध्ये गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. यानंतर मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ उठले होते. तात्काळ पोलीस पेट्रोल पंपातील कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र हॉटेलमध्ये चार ते पाच गॅसच्या टाक्या असल्याने आगीचा फडका होत होता. यानंतर अग्निशमन दल दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे. सुदैवाने यामध्ये कुठलेही जिवीत हानी झाली नाही. टाक्यांमध्ये असलेला गॅस पाण्यासोबत बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रतीक्षेत असलेला मुसळधार पाऊस अखेर कोसळण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने नागरिक आणि शेतकरी चिंतेत होते, मात्र आज अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण या पावसाने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काटेवाडीमध्ये दाखल, भाविकांची मोठी गर्दी
बारामतीमधून मार्गस्थ झालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आता काटेवाडीमध्ये दाखल झाला आहे. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी झाली आहे. संपूर्ण परिसर ज्ञानोबाराया तुकोबारायाच्या गजराने दुमदुमून गेला आहे. बारामतीमधून पुढे निघालेली ही पालखी काटेवाडीमध्ये क्षणभर विश्रांतीसाठी थांबणार आहे.
-
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी विठ्ठलाला घातलं साकडं
उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत, असे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विठ्ठलाला साकडे घातले आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास ज्यांनी खोके घेतले त्यांचा अस्त होईल आणि महाराष्ट्रात चैतन्य निर्माण होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने घाबरले आहेत, म्हणूनच उपमुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. या भेटीमागे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी उपमुख्यमंत्री डाव टाकत आहेत, असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला.
-
वाशिममध्ये मुसळधार पावसाने झोडपले
वाशिम जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, पिंपरी सरहद व कुकसा परिसरातून वाहणारी उतावळी नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीच्या तीरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या हॉटेलमधील एक व्यक्ती काल पाण्याच्या प्रवाहात अडकून पडली होती.मात्र शिरपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत धाडस दाखवले आणि या अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली.ही घटना नागपूर-मुंबई जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील असून, हॉटेल मालकाचे हजारोंच नुकसान झाले आहे.
-
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार आहे. थोड्या वेळात 2721 क्युसेक पाणी सोडणार आहे. पाणी वाढत असल्याने सोमेश्वर धबधबा पूर्ण वाहू लागला आहे. सोमेश्वर धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी झाली आहे.
-
ठाण्यात 32 वाहनांचा चुराडा
ठाण्यात पावसाळ्यात झाडे पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. मागील दीड महिन्यात तब्बल 225 झाडे उन्मळून पडली आहेत. या झाडाखाली 32 गाड्यांचा चुराडा झाला असून यामध्ये 24 चार चाकी गाड्यांचा समावेश झाला असल्याचा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे.
-
अल्पवयीन बालिकेची 24 तासात पोलिसांनी केली सुटका
चार वर्षाच्या अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून मध्य प्रदेश गाठणाऱ्या रणजीत धूर्वे या मजुराला 24 तासाच्या आत उल्हासनगर आणि बदलापूर पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन अल्पवयीन बालकेची सुटका करण्यात आली आहे ..ठाणे शहर पोलिसांच्या उल्हासनगर गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. बालिकेच्या कुटुंबाशी अपहरण कर्त्याचे भांडण झाले होते.. त्यातूनच अपहरण केल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपयुक्त अमरसिंग जाधव यांनी सांगितले आहे.
-
उदय सामंत यांच्यावर राऊतांची टीका
उदय सामंत कोणती भूमिका मांडत आहेत. ते शिंदेंचे मंत्री आहेत ना. त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडली पाहिजे. शिंदे गटाच्या लोकांनी मराठी माणसाची भूमिका ठाम घेतली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
-
एकनाथ शिंदे कुठं लपून बसलेत?
सरकार काय विचार करेल हा सरकारचा विषय आहे. फडणवीस, मिंधे, अजित पवार यांचं जे सरकार आहे. त्यांना या विषयावर भूमिका नाही. ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत बसले आहे. शिवसेना म्हणवून घेणार्या एकनाथ शिंदेंचं मला आश्चर्य वाटतं. कुठे लपून बसले. त्यांनी काय बंकर बिंकर केलाय का. याविषयावर ते काहीच बोलत नाही, असा टोला राऊतांनी लगावला
-
राज आणि उद्धव ठाकरे हे दोघेही गैरजसमजाचे बळी आहेत – आशिष शेलार
भारतीय जनता पक्ष हा मराठीसाठी आग्रही आहे. भाजपा आणि केंद्र सरकार यामुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. प्रयत्नपूर्वक किंवा अनावधानाने गैरसमज पसरवू नये. सत्य लोकांसमोर मांडावं. ते म्हणजे महाराष्ट्रात मराठी अनिवार्य आहे, हिंदीभाषा सक्ती नाही, हिदी ही ऐच्छिक आहे – आशिष शेलार यांचे स्पष्टीकरण
-
सरकार आम्हाला तुरुंगात टाकेल
अभिजात भाषेचा दर्जा देतो म्हणून दुसऱ्या भाषेची सक्ती करावी लागेल असं त्या पत्रात राष्ट्रपतींनी दिलं का. तामिळनाडूत अशी सक्ती आहे का, गुजरातमध्ये आहे का, केरळ, कर्नाटक आणि ओडिशात आहे का. महाराष्ट्रात का. आम्ही जो मराठी भाषेचा पुरस्कार करतोय त्याबद्दल आम्हाला तुरुंगात टाकतील अशी मला भीती वाटते, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.
-
जो मुद्दाच नाही त्यावर मोर्चा काढणं किती हास्यास्पद आहे – भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
जो मुद्दाच नाही त्यावर मोर्चा काढणं किती हास्यास्पद आहे. ठाकरे मुख्यमंत्री असताना माशेलकर समितीचा अहवाल का स्वीकारला ? मोर्चा काढण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यायला हवं, असं ट्विट करत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.
मुळात गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा हा प्रयत्न आहे यांना मराठी भाषेचे काहीच देणघेण नाही हे प्रखर वास्तव आहे.
जो मुद्दाच नाही त्यावर मोर्चा… किती हास्यास्पद… जनतेच्या लक्षात येणार नाही?
महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे हिंदीची सक्ती नाहीच तरी साप साप म्हणत भुई ढोपटण्याच काम… https://t.co/qyGqp60lqc
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 27, 2025
-
मराठी भाषेवर होणार आक्रमण परतावून लावलं पाहिजे – संदीप देशपांडे
मराठी भाषेवर होणार आक्रमण परतावून लावलं पाहिजे. मराठी माणसाची ताकद काय हा संदेश देशाला जाणं गरजेचं आहे – मनसे नेते संदीप देशपांडे
-
कल्याण – अडीच वर्षांच्या मुलाची चोरी करण्याचा प्रयत्न
कल्याण – अडीच वर्षाच्या मुलाला चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नागरिकांच्या मदतीने करण पूरीमणि नावाच्या व्यक्तीला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं.
आरोपी सोलापूरला पलायन करण्याच्या तयारीत असल्याने पोलिसांनी त्याच्याकडून रेल्वे तिकीटदेखील जप्त केलं. तो व्यक्ती कोण आहे, मुलाला का घेऊन जात होता, याचा तपास बाजारपेठ पोलिसांनी सुरू केला आहे.
-
आमचा हिंदीला विरोध नाही पण.. काय म्हणाले संजय राऊत ?
हिंदीच्या नावाने तिसरी भाषा लादली जात आहे. हे ओझं मुलांना पेलवणार नाही. हे शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे. अनेक राज्यातील तज्ज्ञांचं हे मत आहे. आमचा हिंदीला विरोध नाही. पण फक्त महाराष्ट्रात हिंदी लादता येत नाही असं मत संजय राऊत यांनी मांडलं आहे.
-
जुन्या ठाण्यात अजूनही गॅस जोडणी नाही..
जुन्या ठाण्यातील रहिवाशांना पाईपलाईन द्वारे गॅस जोडणी द्या… शिवसेना खासदार नरेश मस्के यांच्या महानगर गॅस अधिकाऱ्यांना सूचना.. ठाणे शहरातील नौपाडा, राम मारुती रोड, घंटाळी, भास्कर कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक गृहसंकुलनामध्ये अजूनही पाईपलाईन द्वारे घरगुती गॅस जोडणी झालेली नाही…
-
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार
थोड्या वेळात सोडणार 2721 क्युसेक पाणी… पाणी वाढत असल्याने सोमेश्वर धबधबा पूर्ण वाहू लागला… सोमेश्वर धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी
-
राज – उद्धव ठाकरेंचा 5 जुलैला मुंबईत एकत्रित मोर्चा
मनसे – ठाकरेंच्या शिवसेनेचा हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा… हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकच मोर्चा निघेल… असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. ठाकरे इज ब्रँड संजय राऊतांकडून आणखी एक ट्विट… संजय राऊतांकडून पुन्हा एकदा ठाकरे बंधुंचा फोटो ट्विट…
-
गुन्हे दाखल होऊनही अनधिकृत शाळा चालक मोकाट
अनधिकृत शाळांचा अहवाल तपासून पोलीस करणार कारवाई… ठाणे महापालिका हद्दीत 81 अनधिकृत शाळा असून त्यातील 65 दिव्यात आहेत… आतापर्यंत 32 शाळांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असून दोन लाखाचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पालिकेने दिली आहे…. अनधिकृत शाळेच्या मनमानी कारभारामुळे आज दिव्यातील १९ अधिकृत शाळा पत्रकार परिषद घेऊन एक जुलैपासून शाळा बंदचा निर्णय घेणार आहे….
-
आज पालखी सोहळा सणसर येथे मुक्कामी
बारामतीकरांच्या पाहुणचारानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ. आज पालखी सोहळा सणसर येथे मुक्कामी असणार. पालखीने बारामतीमधून प्रस्थान केल्यानंतर पालखी न्याहारीसाठी काटेवाडी विसाव्यासाठी थांबणार. काटेवाडीमध्ये रंगणार मेंढ्यांचे रिंगण. धनगर समाजाच्या वतीने ही परंपरा जोपासली जाते. काटेवाडीत पालखीचे आगमन झाल्यावर धोतरांच्या पायघड्या आणि मेंढ्यांच्या रिंगणाने भक्तिमय आणि उत्साही वातावरणात हा सोहळा पार पडतो.
-
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार. सकाळी दहा वाजता 2720 क्युसेकने सोडणार पाणी. दोन दिवसापासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला होता कमी. कालपर्यंत 1760 क्युसेकने होत होता विसर्ग. मात्र पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढवणार. गोदा घाटच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा.
-
प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती योग्य नाही – शरद पवार
“प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती योग्य नाही. पहिली ते चौथी हिंदी सक्ती करणं योग्य नाही. पाचवीनंतर हिंदी शिकवण्यास हरकत नाही. मातृभाषा ही महत्त्वाची आहे. शक्तीपीठला विरोध का आहे, हे समजून घ्यायचय” असं शरद पवार म्हणाले.
-
आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर दर्शनासाठी 24 तास राहणार उघडे
आषाढी वारीसाठी श्री विठ्ठल मंदिर आज पासून अहोरात्र उघडे ठेवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन व्हावे यासाठी नित्यपूजा वगळता सर्व राजोपचार आजपासून बंद असतात. व्हीआयपी ऑनलाईन दर्शन देखील आजपासून राहणार बंद. आज पासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर दर्शनासाठी 24 तास उघडे ठेवण्यात येणार. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. साधारणपणे आषाढ प्रतिपदा ते प्रक्षाळपूजेपर्यंत एकूण 18 ते 20 दिवस विठूराया भक्तांना दर्शन देण्यासाठी अखंड उभा असतो. आज विधिवत पूजा करून देवाचा पलंग काढून ठेवला जातो आणि देवाला उभे राहून कंटाळा येऊ नये यासाठी टेकण्यासाठी मागे लोड ठेवला जातो.
Published On - Jun 27,2025 8:32 AM
