Maharashtra Breaking News LIVE : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरोधात जातीय द्वेष निर्माण करणारी पोस्ट, पोलिसांकडे तक्रार

| Updated on: Jun 18, 2024 | 10:50 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 18 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरोधात जातीय द्वेष निर्माण करणारी पोस्ट, पोलिसांकडे तक्रार

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. निवडणुकीतील विजयानंतर मतदार संघातील जनतेचे मोदी आभार मानणार आहेत. मोदींच्या दौऱ्याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाहणी केली. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा आज इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर,मरीन ड्राईव्ह पोलिसांनी मंत्रालयाच्या गार्डन गेट परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे. या आठवड्यात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्री मंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळी अधिवेशन 27 जून पासून सुरू होत असून, त्या आधी विस्तार करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. नाशिकच्या सातपूर आणि गंगापूर परिसरातील काही भागात पाणीपुरवठा आजही विस्कळीत असेल. काल सातपूर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला गळती लागल्याने आज पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Jun 2024 09:25 PM (IST)

    प्रज्वल रेवण्णाला 24 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

    अश्लील व्हिडिओ प्रकरणी बेंगळुरू न्यायालयाने प्रज्वल रेवण्णाला 24 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी आरोपांनंतर प्रज्वल रेवन्ना परदेशात पळून गेला होता. त्यानंतर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी त्यांना पत्र पाठवून इशारा दिला होता.

  • 18 Jun 2024 09:15 PM (IST)

    पंजाबच्या क्रीडामंत्र्यांचा राजीनामा

    पंजाबचे क्रीडा मंत्री आणि आम आदमी पक्षाचे बर्नाला येथील आमदार मीत हैर यांनी मंत्री आणि आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. ते संगरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.

  • 18 Jun 2024 08:50 PM (IST)

    केदारनाथमध्ये हवामानात बदल, हलक्या पावसासह धुके

    केदारनाथ धाममधील हवामानाचा मूड बदलला आहे. खोऱ्यात हलका पाऊस सुरू झाला आहे. याशिवाय दाट धुकेही आहे. त्यामुळे तापमानातही घट झाली आहे.

  • 18 Jun 2024 08:47 PM (IST)

    भाजपा कोअर कमिटीची बैठक संपली

    नवी दिल्ली :  भाजपा कोअर कमिटीची बैठक संपली आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची पक्षाच्या हायकमांडसोबत चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरली आहे. हाय कमांडची बैठक झाल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांची वेगळी बैठक होत आहे. भाजप मुख्यालयात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील नेत्यांची बैठक सुरु आहे.

  • 18 Jun 2024 08:39 PM (IST)

    श्रीनगरमध्ये ड्रोन-क्वाडकॉप्टर उडणार नाहीत, रेड झोन घोषित

    श्रीनगरला तात्पुरता रेड झोन घोषित करण्यात आला आहे. ड्रोन आणि क्वाडकॉप्टरच्या ऑपरेशनवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीनगर पोलिसांनी मायक्रो ब्लॉगिंग साइट ‘एक्स’वर ही माहिती दिली आहे. त्यात असे लिहिले आहे की, “ड्रोन नियम, 2021 च्या नियम 24(2) मधील तरतुदींनुसार, श्रीनगर शहर ड्रोन आणि क्वाडकॉप्टरच्या ऑपरेशनसाठी तात्काळ प्रभावाने “तात्पुरते रेड झोन” घोषित केले गेले आहे.

  • 18 Jun 2024 08:19 PM (IST)

    दिल्लीत जोरदार खलबतं, भाजपची महत्त्वाची बैठक

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत भाजपची बैठक सुरू आहे. संघटनमंत्री बीएल संतोष, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, महाराष्ट्र विधानसभा भाजप प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजप मुख्यालयात बैठक सुरु आहे. या बैठकीत महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पियूष गोयल, मुंबई भाजपध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील बैठकीला उपस्थित आहेत. विनोद तावडे बैठकीला हजर नाहीत. नितीन गडकरी बैठकीला नाहीत. बैठकीत पराभवाची कारण आणि उपाययोजनेसंदर्भात चर्चा होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातील रणनीती संदर्भात बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • 18 Jun 2024 07:34 PM (IST)

    अमळनेर तालुक्यातील लोंढवे ,निसर्डी , खडके ,जानवे आणि वाघोदे पाच गावांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस

    अमळनेर तालुक्यात तीन महसूल मंडळातील पाच गावांमध्ये काल 17 जून रोजी अतिवृष्टी झाल्याने शेकडो एकर शेती पाण्यात गेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. 17 रोजी रात्री अतिवृष्टी झाली. शिरूड मंडळात 81 मिमी पाऊस पडला मात्र प्रत्यक्षात लोंढवे ,निसर्डी , वाघोदे ,खडके ,जानवे शिवारात ढगफुटी सारखा पाऊस झाला. पातोंडा शिवारात 68 मिमी , मारवड मंडळात ६७ मिमी पाऊस झाला. अमळनेर 39 , नगाव 45 , अमळगाव 30 , भरवस 11 ,वावडे 10 असा सरासरी 43.88 मिमी पाऊस झाला. आतापर्यंत 83.27 मिमी पाऊस झाला आहे.

  • 18 Jun 2024 07:25 PM (IST)

    पोर्षे प्रकरण ताज असताना पुण्यात आणखी एक अपघात, मर्सिडीजने तरुणाला चिरडले

    सीरम कंपनीच्या मालकीच्या भरधाव मर्सिडीजने तरुणाला चिरडले. मर्सिडीज कारने एका कुरियर बॉयला चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात कुरिअर बॉयचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी कार चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले. केदार चव्हाण असं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

  • 18 Jun 2024 07:10 PM (IST)

    कोऱ्हाळे गावतील युवकांनी पवारांकडे बारामतीचा दादा बदलण्याची केली मागणी

    कोऱ्हाळे गावातील युवकांनी शरद पवार यांच्याकडे बारामतीचा दादा बदलण्याची मागणी केली. युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्या आम्हाला आता बारामतीचा दादा बदलायचा अशी मागणी हर्षद खोमणे या तरुणाने सभेत केली.

  • 18 Jun 2024 06:55 PM (IST)

    ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्वार जाळलं टायर

    ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्वार टायर जाळलं होतं. पोलिसांनी रस्त्यावरील टायर बाजूला केलं आहे. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी अशी मागणी ओबीसी आंदोलकांनी केली आहे.

  • 18 Jun 2024 06:50 PM (IST)

    जालन्यामध्ये ओबीसी आंदोलकांचा रास्ता रोको

    ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ धुळे-सोलापूर महामार्गावर ओबीासी आंदोलक आक्रमक झाले आहेत.

  • 18 Jun 2024 06:17 PM (IST)

    नागपूर सहित देशभरातील अनेक विमानतळाला उडविण्याचा मेल

    नागपूर सहित देशभरातील अनेक विमानतळाला उडविण्याचा मेल आला आहे. विमानतळ औथोरिटी ऑफ इंडियाला हा मेल आला होता. दुपारी 3 वाजता हा धमकीचं मेल आल्यानंतर विमानतळ प्रशासन अलर्ट झाले होते. कुठलीही आक्षेपार्ह वस्तू सर्च मध्ये सापडली नसल्याची नागपूर विमानतळ प्रशासनाने माहिती दिली आहे. काही महिने अगोदर देखील अशाच पद्धतीचा मेल विमानतळ प्रशासनाला आला होता.

  • 18 Jun 2024 06:06 PM (IST)

    काही लोक सत्तेचा गैरवापर करतात त्यांना जागा दाखवण्याची गरज – शरद पवार

    काही लोक सत्तेचा गैरवापर करतात. लोकांची कामे करीत नाहीत त्यांना जागा दाखविण्याची ही आगामी विधानसभा निवडणूक आहे.  शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी असा प्रयत्न केला जाईल. लोकांच्या एकीने सर्व प्रश्न सुटले जातात. असं शरद पवार यांनी म्हटले आहे.

  • 18 Jun 2024 06:04 PM (IST)

    प्रकृती खालावत असल्याने लक्ष्मण हाके यांना पाणी पिण्याची विनवणी

    जालना: पाणी घ्या पाणी घ्या अशी तरुणांनी लक्ष्मण हाके यांना विनवणी केली आहे. पाणी पिण्यासाठी तरुणांनी घोषणाबाजी केली. प्रकृती खालावत असल्याने पाणी पिण्याची विनंती उपस्थितानी केल्यानंतर उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी पाण्याचा घोट घेतला.

  • 18 Jun 2024 06:02 PM (IST)

    लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावर आज चर्चा होईल – रावसाहेब दानवे

    लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावर आज चर्चा होणार आहे. अशा बैठका काही आमच्यासाठी नवीन नाही. निवडणुका झाल्या आहेत . निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणुकीला फार काळ उरलेला नाही. सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.

  • 18 Jun 2024 05:46 PM (IST)

    वसई – माझ्या बहिणीला अगोदर ही मारण्याचा प्रयत्न केला होता – मृत तरुणीची बहिण

    माझ्या बहिणीला अगोदर ही मारण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही रविवारी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात ही गेलो होतो. पोलिसांनी त्याला एक दोन दंडे मारून सोडून दिले होते. माझ्या बहिणीचा मोबाईल ही शनिवारी तोडाला होता. तेही आम्ही पोलिसांना सांगितले होते. माझ्या वडिलांनी ताबियात बरोबर नव्हती म्हणून ती कामाला जात होती. आम्हाला न्याय पाहिजे. अशी मागणी मयत आरती यादव हिच्या बहिणीने केली आहे.

  • 18 Jun 2024 05:45 PM (IST)

    विधानसभा निवडणुकला फार काळ उरलेला नाही- रावसाहेब दानवे

    लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावर आज चर्चा होईल. अशा बैठका काही आमच्यासाठी नवीन नाही. निवडणुका झाल्या आहेत. निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणुकला फार काळ उरलेला नाही. सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत, असं माजी खासदार रावसाहेब दानवे म्हणाले.

  • 18 Jun 2024 05:30 PM (IST)

    सर्व देशात बारामतीमध्ये काय होईल याची चर्चा होती- शरद पवार

    60 वर्षापूर्वी माझ्यासोबत काम केलेले अनेकजण येथे उपस्थित आहेत. 1967 साली मला निवडून दिल आणि गाडी थांबली नाही. मीच विसरून गेलो मला किती वेळा निवडून दिलंय. यंदाची निवडणूक अवघड होती दिल्ली आणि सर्व देशात आणि अमेरिकेत देखील निवडणुकीची चर्चा झाली. सर्व देशात बारामतीत काय होईल याची चर्चा होती, असं शरद पवार म्हणाले. वडगाव निंबाळकरमध्ये ते बोलत होते.

  • 18 Jun 2024 05:15 PM (IST)

    वसई हत्या प्रकरण

    आम्ही रविवारी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात ही गेलो होतो. पोलिसांनी त्याला एक दोन दंडे मारून सोडून दिले होते. माझ्या बहिणीचा मोबाईल ही शनिवारी तोडाला होता, तेही आम्ही पोलिसांना सांगितले होते. माझ्या वडिलांनी ताबियात बरोबर नव्हती म्हणून ती कामाला जात होती. आम्हाला न्याय पाहिजे. अशी मागणी मयत आरती यादव हिच्या बहिणीने केली आहे.

  • 18 Jun 2024 04:45 PM (IST)

    शिंदे आणि दादांचे फक्त बुडबुडे – संजय राऊत

    शिंदे आणि दादांचे फक्त बुडबुडे आहेत. आज छगन भुजबळ इथे असते तर मुख्यमंत्रीपदाचा टिळा लागला असतो. शिंदेंनी मत विकत घेतली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

  • 18 Jun 2024 04:40 PM (IST)

    मराठा आणि ओबीसी वाद नको – भाऊसाहेब वाकचौरे

    मराठा आणि ओबीसी वाद नको, सर्वांनी मिळून हा वाद मिटवला पाहिजे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शिर्डीचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे.

  • 18 Jun 2024 04:40 PM (IST)

    महाराष्ट्र राज्यातील राजकारणातील वातावरण सध्या बदलत आहेत – शरद पवार

    महाराष्ट्र राज्यातील राजकारणातील वातावरण सध्या बदलत आहे. राज्यातील 48 पैकी 31 ठिकाणी महाविकास आघाडीला यश आले ही बाब सर्वसामान्य लोकांमुळे घडून आलीय. सत्तेचा वापर हा लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार आहे. जुन्या काळातील सर्व विसरून जायचे आणि नव्या उमेदीने काम करायचे आहे.

  • 18 Jun 2024 04:39 PM (IST)

    लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवार सहानुभूती मिळवण्याचे विरोधकांना यश – सुनील तटकरे

    सुनील तटकरे यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवार सहानुभूती मिळवण्याचे विरोधकांना यश आलं. येत्या काळात महायुतीत समन्व्यक आणखी घट्ट करण्याचे उद्दिष्टे आमच्या समोर आहे. आमचे काही आमदार विरोधकांकडे जातील असा अपप्रचार केला जातोय. सर्व आमदार अजित पवार यांच्या सोबतच राहणार. येत्या काळात संघटना आणखी मजबूत करण्याचे आम्ही काम करणार आहे.

  • 18 Jun 2024 04:30 PM (IST)

    वसईत तरुणीच्या हत्येनंतर रुपाली चाकणकर यांचे ट्वीट

    वसईमध्ये आज भर रस्त्यात तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आपण स्वतः वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून सखोल तपास करून आवश्यक ती कलमे जोडून ठोस दोषारोपपत्र पोलिसांनी करावे असे निर्देश देण्यात आले असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

  • 18 Jun 2024 04:26 PM (IST)

    सुधीर मुनगंटीवार दिल्लीत दाखल

    नवी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार दिल्लीत दाखल झाले आहे.

  • 18 Jun 2024 03:00 PM (IST)

    माजी आमदाराचा अजब सल्ला

    दारू प्यायला गोव्याला कशाला जाता इथं प्या की.इथली गरिबांची दुकानं तरी चालतील.शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चात माजी आमदार के पी पाटील यांनी अजब सल्ला दिल्याने सर्वच चक्रावले.

  • 18 Jun 2024 02:55 PM (IST)

    चंद्रकांत खैरे वडीगोद्रीत उपोषणस्थळी

    उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी वडीगोद्री येथे भेट दिली. उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना प्रकृती सांभाळण्याचे आवाहन खैरे यांनी केले.आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत.तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या. मी राजकीय व्यक्ती असल्याने जास्त काही बोलत नाही, असे ते म्हणाले.

  • 18 Jun 2024 02:45 PM (IST)

    भाजप नेते किरीट सोमय्यांच्या विरोधात तक्रार

    भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात अमरावतीत तक्रार दाखल करण्यात आली होती. सोमय्या यांनी अमरावती विधानसभेच्या मतदारांना जिहादी संबोधले होते.हा लोकशाही आणि निवडणूक आयोगाचा अपमान असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दिली.

  • 18 Jun 2024 02:35 PM (IST)

    पशुसंवर्धन विभागाच सलाईनवर

    पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांना रोगराईपासून वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची मदत होते. पण काही भागात रिक्त पदांमुळे हा विभागच सलाईनवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आणि गुराढोराचे मालक चिंतेत आहे.

  • 18 Jun 2024 02:25 PM (IST)

    आदिशक्ती मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे

    विठ्ठल विठ्ठल नामाचा गजरात आदिशक्ती मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. यावेळी मंत्री गिरीश महाजन ,आमदार चंद्रकांत पाटील यांनी खांद्यावर पालखी घेतली. ते प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले. 315 वे वर्ष 28 दिवसांचा प्रवास असून हजारो दिंड्या मध्य प्रदेश खानदेश विदर्भातील भाविक दाखल झाले आहेत.

  • 18 Jun 2024 02:15 PM (IST)

    भाजप शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

    पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी भाजप शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली.माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा कसबा मतदारसंघात असतो. वारकऱ्यांसाठी पालिकेने विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपने केली आहे.

  • 18 Jun 2024 02:13 PM (IST)

    भाजप नेते किरीट सोमय्याच्या विरोधात अमरावतीत तक्रार दाखल

    किरीट सोमय्या यांनी लोकसभा अंतर्गत अमरावती विधानसभेच्या मतदारांना जिहादी संबोधले होते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावती लोकसभा अंतर्गत अमरावती विधानसभेच्या मतदारांना जिहादी संबोधले…

  • 18 Jun 2024 02:05 PM (IST)

    भाजपच्या नाराजीचा फटका अजितदादांना

    भाजपवरची जी काही नाराजी आहे त्याचा फटका अजित पवारांना बसला हे म्हणणं योग्य असल्याचा भीमटोला रुपाली पाटील यांनी हाणला. पुन्हा सांगते भाजपचा जो 400 चा नारा होता संविधान बदलणार नरेटीव्ह होता. हे आम्ही पहिल्यापासून भाजपा आणि शिंदे गटाला सांगत होतो. भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या बेताल वक्तव्यामुळे फटका बसला आहे अजित पवारांमुळे नाही, असे उत्तर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी दिले.

  • 18 Jun 2024 02:02 PM (IST)

    हजारो विद्यार्थी रस्त्यावर

    चंद्रपूर नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर मेडिकल एंट्रन्स परीक्षा म्हणजेच नीट मध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशन आणि IMA च्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सामील झाले होते. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.

  • 18 Jun 2024 01:14 PM (IST)

    पुण्यातील फुरसुंगी परिसरात श्री शंभू महादेव शाळेसमोर पालकांचे आंदोलन

    सेमी इंग्लिश माध्यम सांगून पालकांकडून अधिकची फी घेतल्याचा पालकांचा आरोप. प्रवेश घेताना इंग्लिश माध्यम सांगण्यात आले, आता मात्र मराठी माध्यमात प्रवेश घेण्याचं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे

  • 18 Jun 2024 01:06 PM (IST)

    मंत्री गिरीश महाजन वारकरी संप्रदायाला संबोधित करणार

    मला खूप आनंद होतो या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा मान मिळाला. दहा कोटी रुपये मंदिरासाठी देण्याची घोषणा मी या ठिकाणी करतो. आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिराला निधी मी कमी पडू देणार नाही.

  • 18 Jun 2024 12:58 PM (IST)

    एक्झिट पोलच्या घोटाळ्याच्या चौकशीची सेबीकडे मागणी केली- अरविंद सावंत

    “एक्झिट पोलच्या अगोदर मोदी आणि शहा यांनी आवाहन केलं होतं की तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवा. नफ्याच्या आशेपोटी गुंतवलेले ३० लाख कोटी रूपयांचा सामान्यांचा तोटा झाला. एक्झिट पोल करणाऱ्या संस्थाच FII शी संबंधित आहेत. आम्ही या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी सेबीकडे केलीय,” असं अरविंद सावंत म्हणाले.

  • 18 Jun 2024 12:50 PM (IST)

    विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस ॲक्शन मोडवर

    विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस ॲक्शन मोडवर असून येत्या 25 जूनला काँग्रेसची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • 18 Jun 2024 12:40 PM (IST)

    नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपूरमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर

    नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपूरमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. मेडिकल एंट्रन्स परीक्षा म्हणजेच नीटमध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपुरात आज हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नीटमध्ये झालेल्या गैरप्रकाराच्या विरोधात चंद्रपुरात आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशन आणि IMA च्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते.

  • 18 Jun 2024 12:30 PM (IST)

    ठाणे कारागृहाच्या जागी उभे राहणार सर्वांत मोठे भव्य पार्क

    ठाणे महापालिका कारागृह प्रशासनाला पडघा येथे सुमारे दीडशे ते दोनशे एकर इतका भूखंड घेऊन देणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पार्क बनवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. त्याला शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कारागृहाला शहराच्या बाहेर हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून कारागृहाच्या जागी ठाणेकरांना सर्वात मोठे पार्क उभारण्याची योजना राबविण्यात येणार आहे.

  • 18 Jun 2024 12:20 PM (IST)

    वसईत प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात निर्घृणपणे केली हत्या

    वसईत प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली. हत्या करतानाचा लाइव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. वसई पूर्व चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरती यादव (वय 20) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव असून रोहित यादव असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. आरोपीला वाळीव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • 18 Jun 2024 12:10 PM (IST)

    कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा

    कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे. ‘शक्तीपीठ’विरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये काँग्रेसचे सतेज पाटीलसुद्धा सहभागी झाले आहेत.

  • 18 Jun 2024 12:10 PM (IST)

    पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन

    पुण्यात ओबीसी संघटना आंदोलन करणार असून आंदोलनाच्या ठिकाणी सगेसोयरे जीआरची होळी करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जीआरची होळी करणार आहेत.

  • 18 Jun 2024 11:58 AM (IST)

    National News : NEET प्रकरणी नव्या याचिकेवर नोटीस जारी

    NEET प्रकरणी नव्या याचिकेवर नोटीस जारी. 8 जुलै रोजी होणार सुनावणी. सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, जर खरोखरच परीक्षेत काही चूक झाली असेल तर ती वेळेत सुधारावी.

  • 18 Jun 2024 11:56 AM (IST)

    Maharashtra News : पुण्यात पोलीस भरती विद्यार्थ्यांच आंदोलन

    पुण्यात पोलीस भरती विद्यार्थ्यांच आंदोलन. वय वाढवून मिळाव यासाठी आंदोलन. 2022-23 साली वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्याला एक संधी मिळावी यासाठी आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे.

  • 18 Jun 2024 11:30 AM (IST)

    Maharashtra News : मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी बोलवली बैठक

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी 5 वाजता काही आमदारांना भेटीसाठी बोलावल्याची माहीती. राज्यातील दुष्काळ, मंत्रीमंडळ विस्तार, विधान परिषद निवडणूक, मराठा आरक्षण आणि वर्धापन दिनानिमित्त आमदार आणि पदाधिकारी चर्चा करणार असल्याची माहिती. 27 तारखेला आचारसंहिता संपल्यावर राज्यात मोठ्या घडामोडींचे संकेत.

  • 18 Jun 2024 11:20 AM (IST)

    Maharashtra News : जत तालुक्यातील पूर्व भाग गुढ आवाजाने हादरला

    जत तालुक्यातील पूर्व भाग गुढ आवाजाने हादरला. 4 ते 5 सेकंदात 2 वेळा जमीनीच्या भूगर्भातुन आला भयानक मोठा आवाज. आवाजाच्या तीव्रतेने अनेक घरातील भांडी पडली खाली. उमदी परिसरासह कर्नाटकच्या विजापूर जिल्हयातील लोणी बुद्रुक, चडचण पर्यंत गावे गूढ आवाजाने हादरली. गेल्या 2 महिन्यात दुसऱ्यांदा घडला गूढ आवाज येण्याचा प्रकार. पूर्व भागातील गावात भीतीचे वातावरण अशी माहिती जत पाणी संघर्ष समिती चे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी दिली

  • 18 Jun 2024 10:57 AM (IST)

    लोकसभा अध्यक्ष कोण होणार?

    लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी आज बैठक होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. लोकसभा अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाबाबत चर्चा होणार आहे.  अश्विनी वैष्णव , जेपी नड्डा, किरण रेजीजू यांच्यासह एनडीए मधील घटक पक्षातील नेतेही उपस्थित राहणार आहेत. लोकसभा अध्यक्ष पदाबाबतच्या निवडीची राजनाथसिंह यांच्यावर जबाबदारी आहे.

  • 18 Jun 2024 10:45 AM (IST)

    रुपाली पाटील अजित पवारांच्या भेटीला

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटलांनी अजित पवारांची भेट घेतली. मुंबईतील देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. रुपाली पाटलांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी दिलेल्या ऑफरवर चर्चा झालीय यावेळी रुपाली पाटलांशी अजित पवारांशी चर्चा केली.  शिवाय मी अजित पवार गटात कायम असल्याचं स्पष्ट केलं आहे.  सुषमा अंधारे यांनी रुपाली पाटलांना ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली होती.

  • 18 Jun 2024 10:30 AM (IST)

    रविंद्र वायकर राज ठाकरेंच्या भेटीला

    मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरून वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते, खासदार रविंद्र वायकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मला बॅलेट पेपरने वाचवलं. एक लाख मतांची मोजणी बाकी असताना विजय कुणी घोषित केलं?, असा सवाल वायकरांनी उपस्थित केला.

  • 18 Jun 2024 10:20 AM (IST)

    मनोज जरांगेंची पत्रकार परिषद

    सर्व भेद विसरून मराठा समाज एकत्र येणार आहे. आपआपसातले मतभेद विसरून आम्ही आरक्षणासाठी लढणार आहोत. आरक्षणासाठी मराठा समाज एकत्र येणार आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत.

  • 18 Jun 2024 10:10 AM (IST)

    संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

    शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. आमची शिवसेना खरी असं म्हणणाऱ्यांना आरशात पाहावं, संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय.

  • 18 Jun 2024 09:55 AM (IST)

    Maharashtra News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीत पदाधिकारीकाऱ्यांची मागणी

    अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघावर शिवसेना दावा ठोकणार… अमरावतीतील दर्यापूर, तिवसा, बडनेरा आणि अचलपूर मतदारसंघावर शिवसेनेचा दावा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीत पदाधिकारीकाऱ्यांची मागणी.. दर्यापूर मतदारसंघातुन निवडणूक लढवण्यास अभिजित अडसूळ इच्छुक

  • 18 Jun 2024 09:50 AM (IST)

    Maharashtra News | रवींद्र वायकर राज ठकरे यांच्या भेटीला

    रवींद्र वायकर राज ठकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

  • 18 Jun 2024 09:47 AM (IST)

    Maharashtra News | राहुल गांधी यांचे लोकसभा सचिवालयाला पत्र

    वायनाड लोकसभा मतदारसंघातील राजीनामा देऊन रायबरेली कायम ठेवणार असल्याचे पत्र… लोकसभा सचिवालयाच्या सूचनेनंतर केंद्रीय निवडणूक आयोग वायनाड मधील पोटनिवडणूक जाहीर करणार

  • 18 Jun 2024 09:29 AM (IST)

    Maharashtra News | भाजपच्या आमदारांना आता अजित पवार महायुतीत नकोसे – सूत्र

    भाजपच्या आमदारांना आता अजित पवार महायुतीत नकोसे… लोकसभेत फटका बसल्याचे भाजपच्या काही आमदारांचं मत… अजितदादा गटाची मते भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचा आरोप… अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 18 Jun 2024 09:26 AM (IST)

    Maharashtra News | शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक

    शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक… माणगावात ग्रामस्थांकडून जोरदार घोषणाबाजी करत अधिसूचनेची होळी… कोल्हापुरात शक्तीपीठ माहामार्ग रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा…

  • 18 Jun 2024 09:21 AM (IST)

    Maharashtra News | ‘माढा मतदारसंघात राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळला नाही’

    ‘माढा मतदारसंघात राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळला नाही…’ भाजपच्या शिष्टमंडळाने पश्चिम संघटन महामंत्र्याकडे अहवाल सोपवला आहे… आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे निलंबन करण्याची मागणी

  • 18 Jun 2024 09:11 AM (IST)

    Maharashtra News | फडणवीसांनी सरकारमध्ये राहावं, अशी विनंती आम्ही केली – बावनकुळे

    फडणवीसांनी सरकारमध्ये राहावं, अशी विनंती आम्ही केली… फडणवीस आमची विनंती मान्य करतील.. असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे.

  • 18 Jun 2024 09:05 AM (IST)

    Maharashtra News | मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आले अच्छे दिन

    सततच्या पावसामुळे अनेक भागातील शेततळे, विहिरी भरायला सुरुवात… सोलापूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून तीव्र दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात झाली होती… अनेक ठिकाणी जनावरांना चारा मिळणे देखील कठीण झाले होते… मात्र आता निसर्गाच्या कृपेने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजाला अच्छे दिन आलेत…

  • 18 Jun 2024 08:54 AM (IST)

    एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून मातोश्री परिसरात जोरदार बॅनरबाजी

    मातोश्री परिसरात शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिवसाचे लागले बॅनर.  एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून मातोश्री परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली असून त्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाचं बांद्रा इथे शक्ती प्रदर्शन सुरू आहे.

    वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांना भगव्या शुभेच्छा , वारसा बाळासाहेबांच्या महाराष्ट्र रक्षणाचा , हिंदूत्व रक्षणाचा असा संदेश बॅनरवर आहे. शिवसैनिकांना भगव्या शुभेच्छा देणार बॅनर सध्या चर्चेत आहे.

  • 18 Jun 2024 08:42 AM (IST)

    नाशिकमध्ये आजी-माजी पालकमंत्री आमने-सामने येण्याची शक्यता

    नाशिक शिक्षक विभाग मतदार संघात आजी-माजी पालकमंत्री आमने-सामने येण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि दादा भुसे येणार आमने-सामने.   राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार तर शिवसेनेकडून नरेंद्र दराडे मैदानात आहेत . महायुती मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्याने पेच वाढला आहे.

  • 18 Jun 2024 08:36 AM (IST)

    आरएसएस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा बैठक होणार

    आरएसएस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा बैठक होणार असून पुढील तीन महिन्यात बैठकीचे आयोजन केले जाणार. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीतीवर चर्चा होणार  आहे.  अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 वा जयंती सोहळा यंदा राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे कालच्या बैठकीत नियोजन झाले.

  • 18 Jun 2024 08:18 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आजा वाराणसी दौऱ्यावर, जनतेचे मानणार आभार

    नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच वाराणसी या आपल्या लोकसभा मतदारसंघात जाणार आहेत. विजयानंतर मतदार संघातील जनतेचे मोदी आभार मानणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाहणी केली. नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी वाराणसी मध्ये भाजपकडून मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

  • 18 Jun 2024 08:15 AM (IST)

    भाजपच्या आमदारांना आता अजित पवार महायुतीत नकोसे ?

    भाजपच्या आमदारांना आता अजित पवार महायुतीत नकोसे झाले आहेत. अजित पवार यांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचं काही आमदारांचं मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published On - Jun 18,2024 8:14 AM

Follow us
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.