Maharashtra Breaking News LIVE : महायुतीत महाभारत आहे: नाना पटोले

| Updated on: Jun 20, 2024 | 8:40 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 19 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : महायुतीत महाभारत आहे: नाना पटोले

आज शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन आहे. शिवसेना पक्ष फुटी नंतर दोन वर्धापन दिन साजरे करण्यात येतात. ठाकरे गटातर्फे षणमुखानंद तर दुसरा शिंदे गटातर्फे वरळीतील डोंम या ठिकाणी वर्धापनदिन साजरा होणार आहे. आहे. वरीळी डोम या ठिकाणी मोठमोठे बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधील नालंदा येथे जाणार आहेत. वाराणसी येथून ते थेट नालंदा येथे जातील. तेथील युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसच्या त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. पश्चिम बंगालमधील कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेची अधिकृत चौकशी जनक कुमार गर्ग करणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नियमित जामीन याचिकेवर राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी होणार आहे. जळगाव जिल्ह्यात आज पासून 137 जागांसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 19 Jun 2024 07:47 PM (IST)

  जळगावात विमान धावपट्टीवरून घसरले

  जळगाव येथे एक प्रशिक्षणार्थी विमान लँड करताना धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली. धावपट्टीवरून घसरल्यानंतर हे विमान धावपट्टीच्या बाजूला जाऊन कोसळले. वेग कमी असल्याने प्रशिक्षणार्थी विमानातील पायलट अथवा कुणालाही दुखापत झालेली नाही. जळगावच्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

 • 19 Jun 2024 07:30 PM (IST)

  एकाच जातीला आरक्षण देणे म्हणजे ओबीसीवर अन्याय – विजयालक्ष्मी हाके

  जालना : जाती जातीमध्ये अंतर पडले आहे. ओबीसीमध्ये 350 हून जास्त जाती आहेत. मात्र, केवळ एकाच जातीला आरक्षण देणे म्हणजे ओबीसीवर अन्याय आहे. घरी असताना मी त्यांची काळजी घ्यायची. इकडे आल्यापासून आम्हाला चिंता वाटते आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या पत्नी विजयालक्ष्मी हाके यांनी केली आहे.

 • 19 Jun 2024 07:16 PM (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल

  नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरकडे प्रस्थान होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यास राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यांचा नाशिकमध्ये दोन दिवसीय धार्मिक दौरा आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे नाशिकमधील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

 • 19 Jun 2024 06:52 PM (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 आणि 21 जूनला जम्मू काश्मीरचा दौरा करणार

  पीएम नरेंद्र मोदी 20-21 जूनला जम्मू-कश्मीरचा दौरा करणार आहेत. केंद्रशासित राज्यात 1,500 कोटी रुपयांच्या 84 लोकाभिमूख योजनाचा शिलान्यास करतील. तसेच 21 जूनला श्रीनगरध्ये 10व्या राष्ट्रीय योग दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतील.

 • 19 Jun 2024 06:37 PM (IST)

  प्रज्वल रेवण्णाला 24 जूनपर्यंत एसआयटी कोठडी

  बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी जेडीएसचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना 24 जूनपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे.

 • 19 Jun 2024 06:25 PM (IST)

  बारामुल्लामध्ये दोन दहशतवादी ठार, सुरक्षा दलांना मोठे यश

  काश्मीरमधील बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. रुहानमध्ये नेहमीच्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सध्या परिसरात मोठी शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

 • 19 Jun 2024 06:10 PM (IST)

  दिल्लीत विजेच्या मागणीने विक्रम मोडले

  दिल्लीतील विजेच्या सर्वाधिक मागणीने सर्व विक्रम मोडले आहेत. आज दुपारी 3.06 वाजता दिल्लीतील विजेची मागणी 8656 मेगावॅट इतकी नोंदवली गेली. दिल्लीच्या इतिहासातील हा सर्वाधिक मागणीचा आकडा आहे.

 • 19 Jun 2024 05:51 PM (IST)

  नाना पटोले यांचा महायुतीतील नेत्यांवर निशाणा

  काँग्रेस नाना पटोले यांनी महायुतीतील नेत्यांवर निशाणा साधला आहे. महविकास आघाडीत कोणताही बिघाड नाही असं म्हणताना महायुतीत महाभारत आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी महायुतीतील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

 • 19 Jun 2024 05:40 PM (IST)

  मोदींनी बारामतीत लक्ष घातल्याने माझा फायदा : शरद पवार

  लोकसभा निवडणूक संघर्षाची होती. तसेच बारामतीकर साथ सोडणार नाही, हा विश्वास होता. मुंबई ते दिल्ली बारामतीचीच चर्चा होती. मोदींनी बारामतीत लक्ष घातल्याने माझा फायदा झाला, असं राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीत भाषण करताना शरद पवार असं म्हणाले.

 • 19 Jun 2024 05:10 PM (IST)

  वरुड मोर्शी मतदारसंघात भाजपचाच उमेदवार द्यावा, कार्यकर्त्यांची मागणी

  भाजपने अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघावर दावा केला आहे. शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. वरुड मोर्शी मतदारसंघात भाजपचाच उमेदवार द्यावा, अशी मागणी यावेळेस कार्यकर्त्यांनी केली.

 • 19 Jun 2024 04:55 PM (IST)

  अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघावर भाजपचा दावा

  अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. वरुड मोर्शी मतदारसंघात भाजपचाच उमेदवार द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांची मागणी केली आहे.

 • 19 Jun 2024 04:45 PM (IST)

  58 वर्धापन दिवस आहे त्याचं एक विशेष महत्त्व- सुषमा अंधारे

  एवढी मोठी आपत्ती आल्यानंतर पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीच्या सामोर गेलो. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी आपल्या नेतृत्व सिद्ध केलं. मोठ्या संख्येने लोकसभेच्या जागा जिंकून आणल्या, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

 • 19 Jun 2024 04:30 PM (IST)

  “साहेबांनी सांगितलं होतं की “मला वाटतं नाही बारामतीकर आपल्याला सोडतील”

  मला इथे बोलायचं, याची काही मी तयारी नव्हती. साहेबांसमोर बोलणं म्हणजे सोपं नसतं कारण एक आदरयुक्त भीती असते. आपण जेव्हा प्रचारात उतरलो तेव्हा काय परिस्थिती होती हे आपण पाहिलं आहे. आपण आपल्या लाडक्या खासदार यांना ४थ्यांदा निवडून दिलं. मला अपेक्षा नव्हती की १.५ लाख मतांनी निवडून येऊ पण साहेबांना माहिती होतं की बारामतीकर आपल्याला कमी पडू देणार नाहीत. निकाल यायच्या आधी मला साहेबांनी सांगितलं होतं की “मला वाटतं नाही बारामतीकर आपल्याला सोडतील, असं युगेंद्र पवार म्हणाले.

 • 19 Jun 2024 04:15 PM (IST)

  नवी मुंबई पोलीस भरती प्रक्रियाचे वेळापत्रक बदलले

  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई रिक्त पदांची प्रवर्ग निहाय भरती प्रक्रिया आज पासून सुरु होणार होती मात्र काल पासून पडत असलेल्या पावसामुळे मैदान चाचणी घेण्यायोग्य नसल्याने सदर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेय. आज भरती प्रक्रियेसाठी आलेल्या आणि उद्या येणाऱ्या उमेदवारांची चाचणी 23 जून रोजी होणार आहे. तर 21 जून आणि 22 जून रोजी जे उमेदवार येणार होते त्यांची मैदानी चाचणी आता 27 जून रोजी घेतली जाणार

 • 19 Jun 2024 02:57 PM (IST)

  लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली

  ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली. उपोषणस्थळी वैद्यकीय पथक दाखल झालं आहे. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची इसिजी काढण्यात येतेय. उपचार घेण्यासाठी वैद्यकीय पथकाकडून विनवणी करण्यात येत आहे. उपचार घेणार नसल्याच्या निर्णयावर उपोषणकर्ते ठाम आहेत.

 • 19 Jun 2024 02:45 PM (IST)

  अरविंद केजरीवाल यांच्याबाबत महत्वाची बातमी…

  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच… राऊज अवेन्यु कोर्टाने 3 जुलैपर्यंत पुन्हा न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. केजरीवाल यांना तिहार तुरुंगातच राहावे लागणार आहे.

 • 19 Jun 2024 02:30 PM (IST)

  NEET परीक्षेतील घोटाळ्यानंतर काँग्रेस आक्रमक

  NEET परीक्षेतील घोटाळ्यानंतर काँग्रेस आक्रमक झाले आहेत. देशभरात काँग्रेसकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 21 जूनला देशभरात काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.  या आंदोलनात काँग्रेसचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी दिल्लीत आंदोलनात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 • 19 Jun 2024 02:15 PM (IST)

  सणसवाडी औद्योगिक वसाहतीत कंपनीची भिंत कोसळली

  पुणे जिल्ह्याच्या सणसवाडी औद्योगिक वसाहतीत एका कंपनीची भिंत कोसळून एक जणाचा जागीच मृत्यू झालाय. तर चार जण गंभीर जखमी झालेत. कंपनीच्या भिंती जवळ हे कामगार उभे असताना अचानक भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.  यात सहा ते सात चारचाकी वाहने तर सात ते आठ दुचाकी वाहनांचंही मोठं नुकसान झालंय. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार अशोक पवार यांनी ही घटनास्थळी भेट दिली.

 • 19 Jun 2024 01:53 PM (IST)

  जालन्यात ओबीसीच्या दहा ते बारा कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

  गोंदी पोलीस ठाण्यात पाच ओबीसीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल. आंबड पोलीस ठाण्यात पाच ते सात ओबीसीच्या अज्ञात कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल. सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यामुळे आणि रस्त्यावर टायर जाळल्यामुळे गुन्हा दाखल.

 • 19 Jun 2024 01:34 PM (IST)

  गिरीश महाजन यांनी केले अत्यंत मोठे विधान

  सरकारने ओबीसी समाजाची दखल घेतली नाही अस नाही,अनेक मंत्री तिथं जाऊन आले आहेत. मी पण त्या ठिकाणी जाणार आहे. आम्ही दखल घेतली आहे. विचार करेल.उपोषण सोडावे त्यांनी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

 • 19 Jun 2024 01:20 PM (IST)

  मनोज जरांगे पाटलांच्या आरोपात तथ्य नाही- पंकज भुजबळ 

  सरकारने ओबीसी समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्या भावना समजून घेऊन मी सरकारकडे त्यांच्या भावना मांडणार. छगन भुजबळ यांनी कुणाची भेट घेतली नाही, ते मीडियात सुरू आहे. भुजबळांनी सरकारमधून बाहेर पडावं अशी समता परिषदेच्या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही.

 • 19 Jun 2024 01:14 PM (IST)

  राजेंद्र गावित यांनी घेतली आरती यादवच्या कुटुंबियांची भेट

  पालघरचे माजी खा राजेंद्र गावित यांनी मयत आरती यादव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. आरती यादवची हत्या ही अतिशय निर्घृणपणे केली आहे. हे एक विकृतीचे दर्शन आहे

 • 19 Jun 2024 12:50 PM (IST)

  उपचार घ्यायचं नाही असं उपोषणाला बसतानाच ठरवलंय- लक्ष्मण हाके

  “शासनाने अद्याप दखल घेतली नाही. शिष्टमंडळ पाठविण्यासाठी सरकारने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. त्यादिवशी आलेले शिष्टमंडळ शासनाचे होते की वैयक्तिक होते हे माहीत नाही. उपचार घ्यायचं नाही असं उपोषणाला बसताना ठरविलं आहे,” असं ओबीसी आरक्षणासाठी लढणारे आंदोलक लक्ष्मण हाके म्हणाले.

 • 19 Jun 2024 12:40 PM (IST)

  अमरावती विमानतळाच्या कामाची पाहणी करण्यासाठी खासदार बळवंत वानखडे दाखल

  अमरावती विमानतळाच्या कामाची पाहणी करण्यासाठी खासदार बळवंत वानखडे दाखल झाले आहेत. येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात विमानतळ सुरू होण्याची शक्यता आहे. विमानतळाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश बळवंत वानखडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 • 19 Jun 2024 12:30 PM (IST)

  राजधानी दिल्लीमधील पाण्याचा प्रश्न आता पंतप्रधान मोदींकडे

  नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमधील पाण्याचा प्रश्न आता पंतप्रधान मोदींकडे गेला आहे. जलमंत्री अतिशी यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे. 21 जूनपर्यंत दिल्लीला 100 MGD पाणी मिळालं नाहीं तर उपोषण करणार असा इशारा अतिधी यांनी दिला आहे. सत्याग्रह आंदोलनं करुन उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

 • 19 Jun 2024 12:20 PM (IST)

  चंद्रपूर- कोळसा खाण व्यवस्थापकाला खासदारांच्या उपस्थितीत मारहाण

  चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरालगतच्या कर्नाटक -एमटा कोळसा खाण व्यवस्थापकाला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आंदोलनादरम्यान मारहाण करण्यात आली. स्थानिकांच्या 16 मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं. आंदोलनस्थळी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिली. यादरम्यान आंदोलक आणि व्यवस्थापक यांच्यात मागण्यांच्या पुर्ततेवरून शाब्दिक चकमक झाली. मारहाणीनंतर पोलिसांनी जमावाला पांगवलं असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम बंद पाडलं आहे.

 • 19 Jun 2024 12:10 PM (IST)

  नाशिक- वर्धापन दिनासाठी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना

  नाशिक- वर्धापन दिनासाठी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. घोषणाबाजी देत शिंदे गटाचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. शिंदे गटाच्या वतीने आज शिवसेना वर्धापन दिन मुंबईत साजरा होणार आहे.

 • 19 Jun 2024 11:55 AM (IST)

  Maharashtra News : सत्ता येते, सत्ता जाते सुध्दा – शरद पवार

  “सत्ता येते, सत्ता जाते सुध्दा. आलेली सत्ता लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठी वापरली तर लोकं आठवण ठेवतात. काही लोकं तात्पुरते यशस्वी होतात. मी नेहमी सांगतो देशात लोकशाहीचे राज्य आहे. या निवडणुकीत वेगळं चित्र होतं. गावचे नेते कुठे होते कोणास ठाऊक? ज्यांना मोठं केलं ते आसपास दिसत नव्हते” असं शरद पवार म्हणाले.

 • 19 Jun 2024 11:40 AM (IST)

  Maharashtra News : सोलापुरात नाना पटोले यांच्या फोटोला चिखल फासो आंदोलन

  सोलापूर भाजप तर्फे नाना पटोले यांच्या पाय धुवून घेण्याच्या कृतीचा निषेध. शहरातील कन्ना चौकात नाना पटोले यांच्या प्रतिमेला चिखल फासून केला निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कष्टकऱ्यांचे पाय धुतात, मात्र काँग्रेस नेते हे कार्यकर्ते आणि जनतेला गुलाम समजतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो.

 • 19 Jun 2024 11:25 AM (IST)

  Maharashtra News : ‘राजकारणात लेखी नाही तर तोंडी पाठिंबा असतो’

  राजकारणात लेखी नाही तर तोंडी पाठिंबा देता येतो. ठाकरे गटाचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी नरहरी झिरवाळ यांची भेट घेतल्यानंतर झिरवाळ यांची प्रतिक्रिया. राजकारणात पाठिंबा मागितलाच तर लेखी नाही तोंडी देता येईल. मी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे हा मानवता धर्म आहे. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांना शुभेच्छा दिल्या असं नरहरी झिरवाळ म्हणाले.

 • 19 Jun 2024 11:12 AM (IST)

  Maharashtra News : गिरीश महाजन यांनी घेतली बैठक

  गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्मल वारी आढावा बैठक. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन. बैठकीला विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित.

 • 19 Jun 2024 10:55 AM (IST)

  Maharashtra News | नवी मुबंईत सर्वत्र ढगाळ वातावरण

  नवी मुबंईत सर्वत्र ढगाळ वातावरण… घणसोली, वाशी, जुईनगर परिसरात ढगाळ वातावरण… मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता

 • 19 Jun 2024 10:47 AM (IST)

  Maharashtra News | अंबरनाथ शहरात पावसाची हजेरी

  अंबरनाथ शहरात पावसाची हजेरी… गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारली होती दडी… वातावरणात बदल निर्माण झाला असून गारवा निर्माण… पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ

 • 19 Jun 2024 10:40 AM (IST)

  Maharashtra News | सरकारने आमचे कोणते लाड केले, उपोषण करावं लागलं – जरांगे पाटील

  सरकारने आमचे कोणते लाड केले, उपोषण करावं लागलं… राजकीय नेते ठरवून भेटायला येतात… आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.

 • 19 Jun 2024 10:33 AM (IST)

  Maharashtra News | नाना पटोले यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन

  नाना पटोले यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन… अकोला याठिकाणी आंदोलन सुरु आहे. नाना पटोले हे संत गजाजन महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. तेव्हा त्यांच्या पायाला चिखल लागला होता. अशात एका कार्यकर्त्याने नाना पटोल यांचे पाय धुतले… याच प्रकरणामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

 • 19 Jun 2024 10:20 AM (IST)

  Maharashtra News | राज्याच्या महायुती सरकारला माणसं विकत घ्यायची सवय – संजय राऊत

  राज्याच्या महायुती सरकारला माणसं विकत घ्यायची सवय लागली आहे. फडणवीसांनी राज्यात 400 पारचा नारा द्यावा… असा टोला देखील राऊत यांनी लगावला आहे. चोरीच्या पैशाने सरकार माणसं विकत घेत आहेत. महायुतीला 5 ते 6 इंजिनं जोडले आहेत, मविआ त्यांच्या पुढे जाणार… असं देखील राऊत म्हणाले.

 • 19 Jun 2024 10:12 AM (IST)

  Maharashtra News | भुजबळ कोणत्या वाटेने येतायत माहिती नाही – संजय राऊत

  भुजबळ कोणत्या वाटेने येतायत माहिती नाही… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे. भुजबळ आणि ठाकरे गटाबाबत कालपासून अफवा सुरु आहेत. भुजबळांना सोबत घेऊन वातावरण बिघडवायचं नाही… सोडून गेलेल्यांची चिंता नाही… भुजबळांना ठाकरे गटाचं कोणी भेटलं नाही आणि भेटणार देखील नाही… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.

 • 19 Jun 2024 10:08 AM (IST)

  Maharashtra News | भुजबळ आणि ठाकरे गटात कोणताही संपर्क नाही – संजय राऊत

  भुजबळांसोबत कोणताही राजकीय संवाद नाही आणि याची शक्यता देखील नाही. भुजबळ आणि ठाकरे गटात कोणताही संपर्क नाही… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

 • 19 Jun 2024 10:00 AM (IST)

  कलाकेंद्रावर संतप्त जमावाचा हल्लाबोल

  छत्रपती संभाजीनगर-बीड राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील थापटी शिवारात सुरू असलेल्या एका कला केंद्रावर संतप्त जमावाने धुडगूस घालत आठ वाहनांची तोडफोड केली, करून मोठे नुकसान केलं आहे. विशेष म्हणजे या परिसरातील 20 गावांनी या कलाकेंद्राला विरोध केला होता. तसेच रास्ता रोको करण्याचा इशारा देखील दिला होता. मात्र कला केंद्र सुरू होणार नाही असे पोलिसांनी आश्वासन दिल्यावर आंदोलन रद्द करण्यात आले होते. मात्र तरीही कला केंद्र सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. अशात संत जमावाने वाहनांची तोडफोड केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 • 19 Jun 2024 09:54 AM (IST)

  शाळेचा अनोखा उपक्रम

  जागतिक पर्यावरण दिवसाचे अवचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर परिसरात असलेल्या कासारवाडी भागातील डी एम के इंटरनॅशनल स्कूल ने एक नवा उपक्रम केला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना व पालकांना प्रत्येकी एक एक नवीन रोपटे देऊन पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगितले.आपल्या घराच्या परिसरामध्ये दिलेले झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा संदेश दिला.

 • 19 Jun 2024 09:45 AM (IST)

  राज्यात महायुती धोक्यात?

  महाराष्ट्रात तीन वर्षांपासून सत्तेत असूनही भाजप आणि महायुतीला लोकसभेत कामगिरी बजावता आली नाही. महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतली. आता चार महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. राज्यातील सर्वात मोठा गड विदर्भातील हारकिरी पक्षाला झोंबली आहे. हा गड मजबूत करण्यात येणार आहे. तर इतर क्षेत्रातील हक्काचे मतदार संघ गेल्याने तिथे डॅमेज कंट्रोल करण्यात येणार आहे. यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महायुतीबाबत मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

 • 19 Jun 2024 09:30 AM (IST)

  डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव

  डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालाय. विटा ग्रामीण रुग्णालयातील या प्रकारामुळे खळबळ माजली आहे. या घटनेत सर्पदंशामुळे साळशिंगेतील चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे.

 • 19 Jun 2024 09:20 AM (IST)

  शनिवारवाड्याच्या भिंतीचा काही भाग कोसळला

  शनिवारवाड्याच्या भिंतीचा काही भाग कोसळला आहे. जिव धोक्यात घालून पर्यटकांना शनिवारवाडा फिरावा लागतोय.रोज हजारो पर्यटक शनिवार वाडा पाहण्यासाठी गर्दी करतात. याच भिंतीवर गोल फिरून पर्यटक शनिवारवाडा पाहतात. २ महिने उलटले मात्र अद्याप डागडुजी करण्यात आलेली नाही

 • 19 Jun 2024 09:10 AM (IST)

  पक्ष फुटीनंतर दोन वर्धापन दिन

  आज शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेचा पक्ष फुटी नंतर दोन वर्धापन दिन साजरे करण्यात येतात. एक ठाकरे गटाचा षणमुखानंद तर दुसरा शिंदेंचा वरळीतील डोंम या ठिकाणी आहे. वरीळी डोम या ठिकाणी मोठमोठे बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत. वाघाने वाघासारखे वागाव भगवं आहे रक्त गर्वाने सांगावं अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. कार्यकर्ते देखील येण्यास सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे

 • 19 Jun 2024 09:00 AM (IST)

  पोलीस भरतीत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

  अमरावती जिल्ह्यात 281 जागांसाठी पोलीस भरती होत आहे. ग्रामीण मध्ये 207 तर शहर मध्ये 74 जागेसाठी भरतीला सुरवात होईल. पारदर्शक पद्धतीने पोलीस भरती होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असे आवाहन पोलीस अधिक्षकांनी केले आहे.

 • 19 Jun 2024 08:58 AM (IST)

  पुणे – शनिवारवाड्याच्या भिंतीचा भाग कोसळला, २ महिने उलटूनही डागडुजी नाही

  शनिवारवाड्याच्या भिंतीचा काही भाग कोसळला आहे. जीव धोक्यात घालून पर्यटकांना शनिवारवाडा फिरावा लागतोय. रोज हजारो पर्यटक शनिवार वाडा पाहण्यासाठी गर्दी करतात. याच भिंतीवर गोल फिरून पर्यटक शनिवारवाडा पाहतात. २ महिने उलटले मात्र अद्याप डागडुजी करण्यात आलेली नाही.

 • 19 Jun 2024 08:57 AM (IST)

  दादर माटुंगा परिसरात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरूवात

  दादर माटुंगा परिसरात सकाळी 7 वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरवात झाली असून आज दिवसभर मुंबईतील वातावरण ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

 • 19 Jun 2024 08:40 AM (IST)

  नवी दिल्ली – दिल्ली एनसीआर सह हरियाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेशातील काही भागात पावसाची शक्यता

  नवी दिल्ली –  उत्तर भारतात उष्णतेची लाट असतानाच हवामान बदलाचे संकेत. दिल्ली एनसीआरसह हरियाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेशातील काही भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता.  हवामान खात्याने वर्तवला अंदाज.  गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उत्तर भारतात उष्णतेची लाट असून पाऊस पडल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 • 19 Jun 2024 08:17 AM (IST)

  राज्यात आजपासून पोलीस भरती सुरू

  राज्यात आजपासून 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती सुरू झाली आहे. राज्यातील विविध पोलीस भरती केंद्रांवर भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. 17 हजार 471 पदांसाठी राज्यभरातून 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्चशिक्षित तरूणांची संख्याही जास्त आहे.

 • 19 Jun 2024 08:14 AM (IST)

  आज शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाकडे लागलं लक्ष

  आज शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर दोन वर्धापन दिन साजरे करण्यात येतात. ठाकरे गटाचा षणमुखानंद हॉलमध्ये तर दुसरा शिंदे गटातर्फे वरळीतील डोंम या ठिकाणी वर्धापन दिन साजरा होईल वरळी डोम या ठिकाणी मोठमोठे बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत.

  वाघाने वाघासारखे वागाव भगवं आहे, रक्त गर्वाने सांगावं अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे लोकसभेनंतर विधानसभेसाठी हा वर्धापन दिन दोन्ही गटासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

Published On - Jun 19,2024 8:11 AM

Follow us
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय.
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य.
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका.
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’.
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?.
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक.
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका.
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा.
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं.