Maharashtra Breaking News LIVE 15 October 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, मतमोजणी केव्हा?
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 14 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यातच राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच महायुतीच्या ७ आमदारांचा शपथविधी होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी विविध धक्कादायक खुलासे होताना दिसत आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांचं पहिलं ट्वीट, म्हणाले…
“लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल ! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू! भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या! या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय.” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
-
उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे शिवसेनेचे (UBT) खासदार अरविंद सावंत म्हणतात, “आम्ही (महा विकास आघाडी) ज्या प्रकारे लोकसभा निवडणूक लढवली, त्याचप्रमाणे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवून जिंकू. भ्रष्टाचार, बेरोजगारी वाढली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था संपूर्ण कोलमडली आहे.”
#WATCH | Maharashtra to vote in a single phase on 20th November | Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant says, “In the same way we (Maha Vikas Aghadi) fought the Lok Sabha elections, we will fight the Maharashtra Assembly elections and win…Corruption, unemployment has increased,… pic.twitter.com/VxfSSeFKSZ
— ANI (@ANI) October 15, 2024
-
-
महाविकास आघाडी निवडणुकीसाठी सज्ज- अनिल देशमुख
20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे राष्ट्रवादी-एससीपी नेते अनिल देशमुख म्हणतात, “महा विकास आघाडी निवडणुकीसाठी सज्ज आहे. जागावाटपाची घोषणा लवकरच केली जाईल. आघाडीतील भागीदारांमध्ये सुरळीत समन्वय आहे. आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जिंकून सरकार स्थापन करू.”
#WATCH | Maharashtra to vote in a single phase on 20th November | NCP-SCP leader Anil Deshmukh says, “Maha Vikas Aghadi is ready for the elections. The declaration for seat sharing will be done very soon. There is smooth coordination between the alliance partners. We will win the… pic.twitter.com/EwwsI6xTHm
— ANI (@ANI) October 15, 2024
-
EVM मध्ये बॅटरी फक्त चालू करतानाच घातली जाते: निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की हरियाणा निवडणुकीत ईव्हीएमसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींना आम्ही प्रतिसाद देऊ. आम्ही प्रत्येक तक्रारीला लेखी उत्तर देऊ. ईव्हीएम एकदा नव्हे तर अनेक वेळा तपासले जातात. ईव्हीएम चालू झाल्यावरच बॅटरी घातली जाते. मतदानाच्या 5-6 दिवस आधी, मशीनमध्ये निवडणूक चिन्ह चिन्हांकित केले जातात आणि नवीन बॅटरी टाकल्या जातात. बॅटरीवर एजंटची स्वाक्षरी देखील असते. सुरक्षिततेचे तीन स्तर असतील जेथे ईव्हीएम ठेवले आहेत.
-
आम्ही निवडणुकीत AI शी संबंधित गोष्टी थांबवत आहोत: निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की एआयएशी संबंधित गोष्टी रोखण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात सोशल मीडिया सेटअप तयार केले आहेत. आम्ही काही थांबविले, काही अवरोधित केले आहेत आणि काहींविरूद्ध गुन्हेगारी खटले दाखल केले आहेत.
-
-
निवडणुका जाहीर करताच संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी सांगितलं की, “आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन करतो की महाराष्ट्राची निवडणूक हरियाणाच्या निवडणुकीसारखी होऊ देऊ नये. पैशाचा खेळ होऊ शकतो.”
#WATCH | Maharashtra to vote in a single phase on 20th November | Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, ” …We appeal EC to not to let Maharashtra election to become like Haryana election…money game might take place…if Election Commission considers themselves unbiased, we… pic.twitter.com/eqs60XYSWo
— ANI (@ANI) October 15, 2024
-
निवडणुका जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मांडलं मत
दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, “महाराष्ट्राच्या निवडणुका होणार आहेत आणि 26 नोव्हेंबरपूर्वी विधानसभा स्थापन होणे अत्यावश्यक आहे. निवडणूक आयोगाने ही घोषणा केल्याचा मला खूप आनंद आहे.
#WATCH | Delhi: On the announcement of election dates for the Maharashtra Assembly election, NCP working president Praful Patel says, “Maharashtra elections are due and it is imperative to have the assembly formation before 26 November. I am very happy that the Election… pic.twitter.com/V6JGMIKdL4
— ANI (@ANI) October 15, 2024
-
झारखंडमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख काय? जाणून घ्या
झारखंडमध्ये उमेदवारी अर्जाची तारीख 18 ऑक्टोबरपासून सुरु होईल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबरपर्यंत असेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 30 ऑक्टोबर आहे. दोन टप्प्यात निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यासाठी 13 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे.
-
झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका का?
झारखंडमध्ये पाच टप्प्यात निवडणुका झाली होती. नक्षलप्रभावित भाग आहे. त्यामुळे दोन टप्प्यात होत आहे. महाराष्ट्रात पूर्वी एक होता आताही एक आहे.
-
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक जाहीर
नांदेड लोकसभा पोडनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेसोबत पोटनिवडणूक पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरला ही मतदान प्रक्रिया पार पडेल.
-
झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार: निवडणूक आयोग
झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 22 तारखेपासून अर्ज दाखल करता येणार
विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.
-
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी
मोठी बातमी समोर आली आहे. अखेर महाराष्ट्रात केव्हा विधानसभा निवडणूक होणार याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली आहे. निवडणूक आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.
-
‘कॉमन मॅन’ उल्लेख असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 60 फुटी बॅनर
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘कॉमन मॅन’ असा उल्लेख असलेला 60 फुट उंच बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. ‘मेहनती ,प्रामाणिक आणि दिवस-रात्र 24 तास जनतेसाठी झटणारा मुख्यमंत्री’ असा उल्लेख या बॅनरवर पाहायला मिळत आहे.
-
बीएमसी कर्मचाऱ्यांना 28 हजार रुपये बोनस, महापालिकेची घोषणा
मोठी बातमी समोर आली आहे. यंदाही बीएमसी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात होणार आहे. महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांठी बोनस रक्कम जाहीर केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
-
सुभाष भांबरे विधानसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता
राजधानी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत सुभाष भांबरे यांच्या नावावर चर्चा. धुळे लोकसभा मतदारसंघात त्यांचा लोकसभा निवडणूकीत पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभा निवडणूकीत नाव चर्चेत.
-
बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी
बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेटीला पोहोचले आहेत. गेल्या एक तासापासून बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत आज मतदान आणि आचारसंहितेची तारीख ठरण्याच्या अगोदरच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थाने खलबत सुरू. विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी मुख्यमंत्र्यांसोबत राहणार का?.
-
संजय राऊत यांच्या डोळ्यात एक्सरे मशीन का? सुधीर मुनगंटीवार
महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रत्येक मतदारसंघात दहा पंधरा कोटी आधीच पोहोचते झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. त्यावर त्यांच्या डोळ्यात एक्सरे मशीन आहे की काय असा प्रश्न पडतो, असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. आपल्या कायद्याचा उपयोग करून ते काहीही बोलतात, असेही मुनगंटीवार म्हणाले.
-
मराठ्यांवर दुर्लक्ष करू नका – मनोज जरांगे पाटील
“सरकारचे काय नियोजन आहे, मला माहित नाही. फडवणीस यांनी मराठ्यांवर दुर्लक्ष करू नये. पुन्हा पुन्हा दुर्लक्ष केले तर, याचे दुष्परिणाम वाईट होतील. ज्या क्षेत्राकडे मराठा समाजाला जायचे नाही, त्या क्षेत्राकडे फडवणीस यांच्या हट्टामुळे, मराठा द्वेषीपणामुळे, मराठ्यांना विनाकारण राजकारणाच्या रस्त्यावर यावे लागेल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
राज्यपाल नियुक्त सात आमदारांनी घेतली शपथ
1- चित्रा वाघ, भाजप
2- विक्रांत पाटील, भाजप
3- धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, भाजप
4- हेमंत पाटील, शिवसेना, शिंदे गट
5- ईदीस नाईकवाडी, राष्ट्रवादी, अजित पवार गट
6- पंकज भुजबळ, राष्ट्रवादी, अजित पवार गट
7- मनिषा कायंदे, शिवसेना, शिंदे गट
या सात राज्यपाल नियुक्त आमदारांनी शपथ घेतली आहे.
-
छत्रपती संभाजी नगर शहरात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी गर्दी
छत्रपती संभाजी नगर शहरात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी गर्दी झाली आहे. केवायसी करण्यासाठी महिलांची पोस्ट कार्यालयात गर्दी झाली आहे. हजारो महिलांची पोस्ट कार्यालयात गर्दी झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी तुफान गर्दी केली आहे.
-
राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी सुरू
राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांनी शपथ घेतली. भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील यांना संधी देण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ यांनी आमदारकिची शपथ घेतली आहे.
-
शिदेंच्या शिवसेनेकडून मनिषा कायंदे यांनी घेतली शपथ
शिदेंच्या शिवसेनेकडून मनिषा कायंदे यांनी आमदारकिची शपथ घेतली. मनिषा कायंदे यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेत संधी देण्यात आली आहे.
-
आमदार बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ते भेटीसाठी दाखल झाले आहेत. विधानसभेच्या निवडणुकी आणि जागा वाटप या विषयांवर चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
-
माझ्या कार्यकाळातील आजची ही शेवटची सभा- अजित पवार
“माझ्या कार्यकाळातील आजची ही शेवटची सभा आहे. उद्यापासून मी पक्षाचा प्रमुख म्हणून फिरणार आहे,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आज राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत.
-
प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा- नरेश म्हस्के
“प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा. महायुतीचा मुख्यमंत्री होणार. कार्यकर्त्यांना असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा. मला असं वाटतं की माझा नेता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतं. त्यामुळे आमचं सरकार बहुमतात निवडून येईल. सगळ्यांना काम करावं लागेल. आपापसांत भांडत राहिलो तर काय होणार,” असं शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
-
डोंबिवलीत होंडा ॲक्टीवा स्कूटीला भर रस्त्यात भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
डोंबिवलीत मिलापनगर येथे होंडा ॲक्टीवा स्कूटीला भर रस्त्यात भीषण आग लागली. अचानक गाडीला आग लागल्याने गाडी चालकाने प्रसंगावधान राखून गाडी सोडून काढला पळ. स्थानिक नागरिकांनी पाणी मारत आग नियंत्रणात आणली , सुदैवाने जीवितहानी टळली.
-
आमची वाट लावाल तर मराठे तुमचीही वाट लावणार – मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांकडे दुर्लक्ष करू नये. आमची वाट लावाल तर मराठे तुमचीही वाट लावणार, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
-
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एक जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एक जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात. आरोपी धर्मराज कश्यप याच्या एका नातेवाईकाला बहराईच मधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीला घेऊन पोलिस मुंबईकडे रवाना झाले आहेत.
-
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने परिवर्तन महाशक्तीची 17 तारखेला नियोजन ठक
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने परिवर्तन महाशक्तीची नियोजन बैठक 17 ऑक्टोबरला होणार आहे. संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी हे बैठकीस उपस्थित राहतील.
-
बारामती – धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोसायटीसमोर ढोल बजाव आंदोलन
बारामती – धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीच्या गेट समोर ढोल बजाव आंदोलन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
महायुती सरकार न्यायव्यवस्थेलाही जुमानत नाही – वरुण सरदेसाई यांची टीका
विधानपरिषदेतील 12आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण कोर्टात असताना, निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. हा विषय न्यायप्रविष्ट असताना हे सरकार नेमणूक कशी करू शकते? महायुती सरकार न्यायव्यवस्थेलाही जुमानत नाही, हेच यावरुन दिसते, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते वरूण सरदेसाई यांनी केली आहे.
विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण कोर्टात असताना, निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
हा विषय न्यायप्रविष्ट असताना हे सरकार नेमणूक कशी करू शकते? महायुती सरकार न्यायव्यवस्थेलाही जुमानत नाही, हेच यावरुन दिसते.
— Varun Sardesai (@SardesaiVarun) October 15, 2024
-
Maharashtra News: जेष्ठ नेते मधुकर पिचड अत्यवस्थ
जेष्ठ नेते मधुकर पिचड यांना पहाटेच्या दरम्यान आला ब्रेनस्ट्रोक… राजूर येथील राहत्या घरी असताना पिचडांना ब्रेनस्ट्रोक…
-
Maharashtra News: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
थोड्याच वेळात राज्यपाल सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात दाखल होणार आहेत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना शासकीय सलामी देण्यात येणार आहे… राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त शासकीय विश्रामगृहाबाहेर मोठा पोलीस पाऊस फाटा तैनात करण्यात आला आहे. सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी राज्यपाल संवाद साधतील
-
Maharashtra News: राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काही जण करणार याचिका
राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काही जण याचिका करणार आहेत… जर १२ च्या आधी सुनावणी झाली तर स्टे पण मिळू शकतो… राज्यपाल आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत… जी नावं जाहीर झालेली आहेत ती कधी सामाजिक क्षेत्रात होती. त्यांनी नावांचीं छाननी केली आहे का? राज्यपालाच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकत नाही पण आव्हान देण्याची एक प्रक्रिया उपलब्ध आहे.
-
Maharashtra News: टोल नाक्यावर सेना-भाजप आणि मनसे कडून बॅनरबाजी
एकीकडे टोल फ्री केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभाराचे बॅनर लागले आहेत. तर दुसरीकडे मनसेकडून राज साहेब यांचे अभिनंदनचे बॅनर मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाका परिसरात लावण्यात आले आहेत… मनसेच्या आंदोलनाला मोठे यश मुंबईकरांना टोल माफी…
-
Maharashtra News: मुलुंड टोल नाक्यावर पुन्हा वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा
हलक्या वाहनांसाठी टोलमाफीची अंमलबजावणी सुरू असतानाही, अवजड वाहनांसाठी टोल वसुली सुरू. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी… वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहून वाहनचालक त्रस्त झाले असून ही परिस्थिती तात्काळ सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे…
-
भाजपने लावलेल्या बॅनरवर अजितदादांचा फोटो वगळला
जळगावत लाडकी बहिण योजनेसंदर्भात भाजपने लावलेल्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो वगळला आहे. बॅनरवर महापुरुषांच्या फोटो नंतर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नसल्यामुळे भाजपने लावलेल्या या भव्य बॅनरची जळगावात चर्चा रंगली आहे. भाजपने लावलेल्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
महायुतीचे सरकार बहुमताने येणार; या आमदाराला विश्वास
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार बहुमताने येणार, बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी विश्वास व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत जो निरेटिव्ह सेट केला होता तो संपला आहे. त्यामुळे आता महायुती सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं बहुमत मिळेल. महायुती सरकारने सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील 80 टक्के माता भगिनी महायुतीला आशीर्वाद देतील, असं राऊत म्हणाले.
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद
संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरु आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी. निवडणूक आयोगाने जागृक राहावं, असं संजय राऊत म्हणाले.
-
ठाण्यात वाहतूक कोंडी
ठाण्यात आज वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक कोंडी झाली आहे. आनंद नगर जकात नाका ते तीन हात नाका पर्यंत वाहतूक कोंडी झालीय. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची दोन ते तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्यात. हलक्या वाहनांना टोलमुक्त करून देखील वाहतूक कोंडीचा सामना चाकरमान्यांना करावा लागत आहे. रुग्णवाहिकांना देखील वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. काल मध्यरात्रीपासून लहान वाहने टोल फ्री झाली मात्र वाहतूक कोंडी पासून कधी फ्री होणार असा सवाल पुन्हा एकदा वाहनधारक उपस्थित करत आहेत.
-
Maharashtra News Live Update : उदय सामंत आणि जरांगे यांच्यात दोन तास चर्चा
मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. अंतरवाली सराटीमध्ये मध्यरात्री उदय सामंत आणि जरांगे यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. उदय सामंत आणि जरांगे यांच्यात दोन तास चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
-
Maharashtra News Live Update : दहिसर टोलनाक्यावर मनसेकडून फटाक्यांची आतषबाजी
दहिसर टोलनाक्यावर मनसेची फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. रात्री 12 वाजता दहिसर टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला जात आहे. रात्री 12 वाजताच दहिसर टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी टोल ओलांडणाऱ्या कार चालकांना मिठाई दिले.
-
Maharashtra News Live Update : टोलमाफीच्या निर्णयानंतर राहुल शेवाळेंकडून पेढे वाटून सेलिब्रेशन
राज्य सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये मुंबई प्रवेश द्वारावर असलेल्या पाचही टोल नाक्यावर वाहनांना टोल माफीचा निर्णय घेतला आणि राज्यात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला,रोजच्या रोज प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना याचा मोठा फायदा होणार असल्याने आपल्याला दिवाळी भेट मिळाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. याच अनुषंगाने शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी वाशी टोल नाक्यावर येऊन एकच जल्लोष केला. रात्री 12 वाजता या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने याच वेळी शेवाळे आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने याठिकाणी येऊन प्रवाशांना पेढे वाटून आनंद साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्षात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले त्यात लाडकी बहिण आणि टोल माफी आणि इतर अनेक निर्णयामुळे करोडो नागरिकांना याचा थेट फायदा झाला असून, शिंदे सरकारने पुन्हा एकदा सर्व सामान्य जनतेचे सरकार असल्याचे दाखवून दिले आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण मंत्री मंडळाचे आभार व्यक्त करून संपूर्ण राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत असल्याची प्रतिक्रिया शेवाळे यांनी दिली.
Published On - Oct 15,2024 8:38 AM