AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा सरकारला कडक इशारा

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अन्यथा शेतकऱ्यांसोबत शिवसेना रस्त्यावर उतरणार असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सरकारला देण्यात आला आहे.

...तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा सरकारला कडक इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2025 | 6:14 PM
Share

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला आहे, पावसाचा चांगलाच तडाखा राज्याला बसला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसामुळे केवळ पिकांचंच नाही तर शेतीचं देखील नुकसान झालं आहे. शेतीची माती देखील पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेली आहे.

ग्रामीण भागांमध्ये तर परिस्थिती खूपच बिकट झाली आहे, अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून घरादारात पाणी घुसलं आहे, संसारोपयोगी साहित्य देखील पाण्यात वाहून गेल्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अनेक गावांचा संर्पक तुटला आहे. याचा सर्वाधिक फटका यंदा मराठवाड्याला बसला आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली, यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मराठवाड्यात पहिल्यांदाच इतकं अतिप्रचंड नुकसान झालं आहे. पंजाबमध्ये जर हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळत असेल तर महाराष्ट्रात देखील हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत का देऊ शकत नाहीत? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पुढं बोलताना ते म्हणाले की, मराठवाड्यावर पहिल्यांदाच भीषण संकट आहे,  सरकारची मदत ही  फारच तुटपुंजी आहे. आता शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीसा देखील यायला लागल्या आहेत. मात्र मी शेतकरी बांधवांना आव्हान करतो की, कोणीही आत्महत्या करायची नाही, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, जर बँकेची नोटीस आली तर ती आमच्या कार्यालयात आणून द्या, आम्ही बघू त्याचं पुढे काय करायचं ते असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कर्जमाफीवरून देखील त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आलो आहे, एखाद्या गोष्टीची जाहिरातबाजी करण्याचा माझा स्वभाव नाही, मात्र अजूनही शेतकरी ती कर्जमाफी विसरलेला नाहीये,  आता सरसकट कर्जमाफी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कर्जमाफीची योग्यवेळ पंचांगात मुहूर्त बघून येणार का? जर कर्जमाफी झाली नाही तर शिवसेना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरणार असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...