Maharashtra Local Body Elections 2025 : शिंदेसेनेच्या आमदाराकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, संतोष बांगर यांनी त्या महिलेला काय सांगितलं ?
राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना, हिंगोलीतील कळमनुरी येथे मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात घोषणाबाजी करत एका महिलेला ईव्हीएमबाबत सूचना दिल्या. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, निवडणूक आयोग आमदारांवर कोणती कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यभरात आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. सकाळपासून 12 हजारांपेक्षा अधिक मतदान केंद्रावर मतदानाला सुरूवात झाली असून हजारो नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. ठिकाठिकाणी निवडणूक अधिकारी , कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून कोणताही गैरप्रकार घडूनये म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान हिंगोली येथील कळमनुरी येथील नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला देखील सुरूवात झाली असून आज सकाळीच अनेक नागरिकांनी मतदान करत कर्तव्य पूर्ण केलं. मात्र याच कळमनुरी मतदारसंघात मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. त्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शिंदे सेनेच्या आमदारकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग
हिंगोली येथील कळमनुरी येथील नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला, अनेकांनी मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजवला. त्याचदरम्यान कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनही मतदना करत कर्तव्य पूर्ण केलं. हिंगोली शहरातील मंगळवार भागातील कन्या शाळेत आमदार बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र हेच मतदान करताना त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं उघड झालं आहे. व्होटिंग बूथवर असतानाच त्यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचं समोर आलं. कारण मतदान केल्यानंतरच संतोष बांगर यांनी घोषणा दिल्या.
बांगर यांच्याकडून घोषणाबाजी
आमदार संतोष बांगर यांच्या कडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाला. ‘स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढो’ अशा घोषणा बागंर यांनी मतदान केंद्रात दिल्याचे उघड झाल. एवढंच नव्हे तर मतदान केंद्रात ईव्हीएमचे बटन दाबताना महिलेला आमदार बांगर यांनी सूचना केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या या कृतीनंतर या प्रकरणात निवडणुक आयोग आमदार बांगर यांच्यावर काय कारवाई करते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्या दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत शिवसेनेवरती गुलाल पडणार आहे , अशी प्रतिक्रियाही आमदार संतोष बांगर यांनी दिली. आता त्यांच्यावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
