‘गृहमंत्रिपदाची चर्चा उघड -उघड होत नाही, बंद दाराआड…’, भाजपच्या बड्या नेत्यानं शिंदे गटाला सुनावलं!

समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून गृहमंत्रिपदाची मागणी करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे भाजप गृहमंत्रिपद सोडायला तयार नसल्याचं समोर येत आहे.

'गृहमंत्रिपदाची चर्चा उघड -उघड होत नाही, बंद दाराआड...', भाजपच्या बड्या नेत्यानं शिंदे गटाला सुनावलं!
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 3:28 PM

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीनं राज्यात तब्बल 230 जागांवर विजय मिळवला. मात्र असं असताना देखील अजूनही महायुतीमधून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. समोर येत असलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणीस हेच नवे मुख्यमंत्री असणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे, मात्र अद्यापही घोषणा करण्यात आलेली नाहीये. दुसरीकडे सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसल्याची माहिती समोर येत आहे. गृहमंत्रिपद मिळालं तरच उपमुख्यमंत्रिपद स्विकारेल अशी त्यांची भूमिका आहे. परंतु भाजप गृहमंत्रिपद आपल्याकडेच ठेवण्यासाठी अग्रही आहे. यावर अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. जर गृहमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना मिळालं नाही तर उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेच्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले दरेकर?  

गृहमंत्रिपद कुणाला द्यायचं याची चर्चा उघड उघड होत नाही, बंद दाराआड ही चर्चा होते. वरिष्ठ नेते ठरवतील गृहमंत्रिपद कुणाला द्यायचं, कोण अडून बसलंय ? नडून बसलंय याला काही महत्त्व नाही , महायुतीत समन्वय आहे. पाच तारखेला सगळं क्लियर होईल. आमच्यात एक नंबर दोन नंबर अशी कोणतीच स्पर्धा नाहीये, सगळे मिळून महायुतीत काम पाहत आहोत. विरोधक हरले म्हणून फेक नरेटिव्ह पसरवत आहेत.  शिवसेनेतून कोण आमदार मंत्री असावा याबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेतील. भाजपकडून आमदाराला मंत्रिपद देताना अनेक निकश लावले जातात, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून देखील ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जिंकले तर ईव्हीएम चांगले, कर्नाटकमध्ये जिंकले, तेलंगणामध्ये जिंकले, पवार धुर्त आहेत, आमदार टिकवण्यासाठी ते असं बोलत असतील.  कारण त्यांचे आमदार एकतर अजित पवार यांच्याकडे जातील किंवा भाजपात येतील असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

शिंदेंकडून कोणाची वर्णी अन् कोणाला डच्चू? अर्थ, गृह..बडी खाती कोणाकडे?
शिंदेंकडून कोणाची वर्णी अन् कोणाला डच्चू? अर्थ, गृह..बडी खाती कोणाकडे?.
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.