Akola : नगरपालिकेसमोर महिलांनी फेकले कळशी अन् हंडे, पाण्याच्या समस्येनं हैराण

| Updated on: Mar 30, 2022 | 6:55 PM

अकोल्यात (Akola) प्रभाग क्रमांक 8 मधील महिलांनी (Womens) महानगरपालिकेवर आंदोलन (Agitation) केले. आंदोलनकर्त्या महिलांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांचे वाहन अडवण्याचाही प्रयत्न केला.

Follow us on

अकोल्यात (Akola) प्रभाग क्रमांक 8 मधील महिलांनी (Womens) महानगरपालिकेवर आंदोलन (Agitation) केले. आंदोलनकर्त्या महिलांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांचे वाहन अडवण्याचाही प्रयत्न केला. संतप्त झालेल्या महिलांनी आयुक्त यांच्या कार्यालासमोर माठ फोडून, कळशी व हंडे फेकून निषेध केला. अकोल्यातल्या प्रभाग क्रमांक 8मधील लहरिया नगर, नागेवाडी, वाकापूर प्रभागातील रहिवाशांना गेल्या चाळीस वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे येथील महिला आक्रमक झाल्या. आज महिलांनी महानगरपालिकेसमोर आंदोलन करत निषेध व्यक्त केला.