Cylone | चक्रीवादळांच्या कचाट्यात सापडून दरवर्षी शेकडो भारतीयांचा मृत्यू

गेल्या दोन वर्षात अनेक चक्रीवादळांचा सामना केल्यानंतर आता भारताला पुन्हा एकदा जवाद चक्रीवादळाचा धोका आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

1/5
गेल्या महिन्यापासून दक्षिण भारतात आणि गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम आणि उत्तर भारतात वादळी पाऊस पडत आहे. अवकाळी पाऊस भारतासाठी नवीन नाही, परंतु गेल्या काही वर्षांत भारतात अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळांची वारंवारता वाढत आहे. विशेषत: पावसाळ्यानंतरचे चक्रीवादळ.

2/5
गेल्या दोन वर्षात अनेक चक्रीवादळांचा सामना केल्यानंतर आता भारताला पुन्हा एकदा जवाद चक्रीवादळाचा धोका आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येणाऱ्या चक्रीवादळांमुळे दरवर्षी भारतात शेकडो लोकांचा मृत्यू होतो.

3/5
नुकताच, भूविज्ञान मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालनुसार, उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांची वार्षिक वारंवारता 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे 1951 ते 2018 पर्यंत कमी झाली होती. मात्र, गेल्या दोन दशकांत, मान्सूननंतर अत्यंत तीव्र चक्रीवादळांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे

4/5
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात 2019 मध्ये अरबी समुद्रात 5 चक्री वादळे आणि बंगालच्या उपसागरात 3 चक्री वादळे आली, त्यापैकी सहा तीव्र वादळांच्या श्रेणीतील होती. तर, 2020 मध्ये अरबी समुद्रात 2, बंगालच्या उपसागरात 2 आणि उत्तर हिंद महासागरात एक चक्री वादळे आली, त्यापैकी 5 तीव्र चक्रीवादळांच्या श्रेणीत होते. यावर्षी जून 2021 पर्यंत, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीतील प्रत्येकी एक वादळ धडली आहेत.

5/5
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2010 पासून भारतात चक्रीवादळामुळे 748 लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे, चक्रीवादळामुळे दरवर्षी सरासरी 72  लोकांचा मृत्यू होत आहे. आणि ही चिंतेची बाब आहे की भारतातील प्रगत हवामान अंदाज प्रणाली, तज्ञ मिटरिओलॉजिस्ट असूनही अनेक वेळा तीव्र पावसाचे अंदाज चुकतात. यामुळे एजन्सींना तयारीसाठी कमी वेळ मिळतो.

Published On - 6:30 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI