Rajiv Shukla : डोनाल्ड ट्रम्प तर मोठ्या भ्रमात, भारतीय अर्थव्यवस्था तर… काँग्रेस नेते राजीव शुक्लांच्या ‘त्या’ विधानाची अमेरिकेपर्यंत चर्चा
Rajiv Shukla Statement : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ कार्ड खेळले. त्यावर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. मोदी सरकारवर दबावतंत्राचा वापर होत असतानाच आता काँग्रेस नेते बचावात्मक पवित्र्यात समोर आले आहे. हे वेगळच गुळपीठ समोर येत आहे. राजीव शुक्ला यांनी अमेरिकेला खडे बोल सुनावले आहे.

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावतंत्रावर भारतातून टीकेची झोड उठली आहे. मोदी सरकारने अर्थातच सावध प्रतिक्रिया दिली आहे. भारताने रशियासोबतच्या संबंधात हात आखडता घ्यावा ही ट्रम्प नीती आहे. मोदी सरकारवर दबावतंत्राचा वापर होत असतानाच आता काँग्रेस नेते बचावात्मक पवित्र्यात समोर आले आहे. हे वेगळच गुळपीठ समोर येत आहे. राजीव शुक्ला यांनी अमेरिकेला खडे बोल सुनावले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताची अर्थव्यवस्था कमकुवत असल्याचा एक प्रकारे सूर आळवला आहे. त्याविरोधात आता काँग्रेसचे नेते सुद्धा मैदानात उतरले आहेत. खासदार राजीव शुक्ला आणि खासदार शशी थरूर यांनी ट्रम्प यांच्यावर पलटवार केला आहे. ट्रम्प यांचा दावा खोडत भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे,असे या दोन्ही नेत्यांनी ठणकावले आहे. त्यामुळे मोदी सरकार अडचणीत असताना विरोधकही मैदानात उतरत असल्याचे चित्र समोर येत आहे.
काय म्हणाले शुक्ला
काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांनी जोरदार पलटवार केला. भारत आणि रशियाची अर्थव्यवस्था आता संपली आहे, असे विधान ट्रम्प यांनी केले होते. पण त्यांचा हा दावा खोटा असल्याचे शुक्ला म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. ती संपली नाही. पी व्ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात आर्थिक सुधारणा राबवण्यात आला. अटलबिहारी वाजपेयी यांनी या सुधारणा पुढे नेल्या. मनमोहन सिंह यांनी 10 वर्षांत ही अर्थव्यवस्था भक्कम केली. सध्याचे सरकार सुद्धा त्यावर मेहनत घेत आहे, असे मोठे वक्तव्य शुक्ला यांनी केले.
ट्रम्प अजूनही भ्रमात
आमची आर्थिक स्थिती अजिबात कमकुवत नाही. जर कोणी दावा करत असेल की भारताला कोणी आर्थिकदृष्ट्या संपवू शकते, तर तो मोठ्या भ्रमात आहे. ट्रम्प हे भ्रमात जगत आहेत. टॅरिफ लावणे हे चुकीचे आहे. प्रत्येक देशाला त्याच्या आवडत्या देशासोबत व्यापार करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांच्यावर रोक लावणे, त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करणे, ब्रिक्सविरोधात बोलणे, रशियाशी व्यापार आणि आयातविरोधात बोलणे हे काही योग्य नाही, असे शुक्ला म्हणाले.
शशि थरुर यांचा घणाघात
काँग्रेसचे लोकसभेतील खासदार शशि थरुर यांनी अमेरिकेच्या धोरणावर घणाघात घातला. 25 टक्के टॅरिफ आणि दंडात्मक कारवाई ही तर सरळ सरळ सौद्याची रणनीती असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेच्या या धोरणांमुळे भारताचा अमेरिकेसोबतच व्यापार संपुष्टात येण्याचा धोका आहे. अमेरिका आपल्यासाठी मोठी बाजारपेठ आहे. पण अमेरिकेच्या धोरणाने भारताचे नुकसान होऊ शकते, असे मत थरूर यांनी मांडले.
