ट्रेनच्या एसी कोचमध्ये बसला होता, GRPने बॅग उघडायला सांगितलं; त्यानंतर जे मिळालं… रेल्वे पोलीस एवढे…
उत्तर प्रदेशातील बस्ती रेल्वे स्थानकावर जीआरपीने एका मोठ्या कारवाईत 1 कोटी 25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. लालू माहिश नावाच्या एका तस्कराकडून हे दागिने जप्त करण्यात आले. तो लखनऊहून गोरखपूरला हे सोनं घेऊन जात होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई पार पाडण्यात आली.

उत्तर प्रदेशातील बस्ती रेल्वे स्थानकात सर्व काही सुरळीत सुरू होतं. नेहमीप्रमाणे ट्रेन येत होत्या, जात होत्या. प्रवासी उतरत होते, एक्सप्रेसमध्ये चढत होते. काही प्रवाशी तर आपआपल्या गाडीची वाट पाहत शांतपणे प्लॅटफॉर्मवर बसले होते. अचानक तिथे जीआरपीची टीम धावतच आली. जीआरपीची टीमही एका ट्रेनची वाट पाहत होती. जीआरपीला या ट्रेनची चेकिंग करायची होती. कारण त्यांना एक टिप मिळाली होती. एका प्रवाशाबाबतची ही टिप होती. या आरोपीला पकडल्यानंतर मोठा खुलासा होणार होता. त्यामुळे जीआरपीच्या टीमची नजर फक्त आणि फक्त येणाऱ्या ट्रेनवर होती. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस प्लॅटफॉर्मवर पाहिल्यानंतर प्रवाशांमध्येही कुजबुज सुरू झाली होती.
बस्ती रेल्वेच्या जीआरपी पोलिसांच्या टीमने चेकिंग दरम्यान 1 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ट्रेनमधून जप्त केले आहेत. हे सर्वजण तस्कर होते. त्यांच्याकडे अवैध सोनं सापडलं. ते लखनऊवरून गोरखपूरला हे सोनं घेऊन चालले होते. खबऱ्यांनी सूचना दिली. त्यानुसार जीआरपीच्या पोलिसांनी ट्रेनमध्ये घुसून एसी कोचमध्ये बसलेल्या तस्कराच्या मुसक्या आवळल्या.
जीआरपीला टिप मिळाली
ट्रेनमध्ये संशयास्पद वस्तूंची तपासणी सुरू असताना जीआरपीला माहिती मिळाली होती की ट्रेन नंबर 20103 एलटीटी एक्सप्रेस (Ltt Gkp Superfast Express) च्या बी2 कोचमध्ये तस्करीद्वारे अवैधपणे सोन्याचे आभूषण चोरून आणले जात आहेत. या दरम्यान 30 वर्षीय लालू माहिश नावाच्या व्यक्तीची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्याच्या जवळून 1574 ग्राम सोन्याचे आभूषण सापडले. त्यांची बाजारातील किंमत 1 कोटी 25 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या सापडलेल्या वस्तूंच्या घटनानंतर जीआरपीची टीम आणि अधिकारी खूप आनंदित झाले, कारण त्यांनी एक अपराध उघडकीस आणला.
सोने तस्कर पकडला
पकडलेला तस्कर लालू माहिश पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. त्याने सांगितले की, जुयेब खान नावाच्या व्यक्तीने त्याला सोन्याचे आभूषण दिले होते. हे आभूषण गोरखपूरमध्ये डिलिव्हरी करण्यासाठी होते. जीआरपीने गोल्ड तस्करला अटक केली आहे.
किती माल पकडला?
सीओ जीआरपी विनोद कुमार सिंग यांनी सांगितले की, ट्रेनमध्ये तपासणीदरम्यान संशयित व्यक्तीला तपासले गेले. त्याच्याकडून 1 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे आभूषण सापडले आहेत. अवैधणे हे दागिने नेले जात होते. त्यामुळे सोन्याचे हे आभूषण सील करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती आयकर विभाग आणि राज्यकर विभागाला दिली गेली आहे, जे सापडलेल्या सोन्याच्या वैधतेची तपासणी करत आहेत.
