गेल्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या लोकसभा आखाड्यात फरक काय, कोणते आव्हान? शरद पवार यांचे उत्तर भाजपसाठी अलार्म?

Sharad Pawar on PM Narendra Modi : सध्या शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही. भाजपने अब की बार 400 पार नारा दिला. पण अनेक सहयोगींनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. आता शरद पवार यांनी पण भाजपला आरसा दाखवला आहे.

गेल्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या लोकसभा आखाड्यात फरक काय, कोणते आव्हान? शरद पवार यांचे उत्तर भाजपसाठी अलार्म?
शरद पवार
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 4:11 PM

Lok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत न भूतो न भविष्यति अशी सरळमिसळ झाली आहे. अनेक वर्षांपासूनचे मित्र एकमेकांविरोधात उभे ठाकले. तर वैचारिक शत्रू ही निवडणूक एकत्र लढत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात NDA तर काँग्रेससह INDIA Alliance असा काहीसा हा सामना आहे. याच पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राने शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यात गेल्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काय फरक आहे, कोणते आव्हान आहे, याचे मार्मिक उत्तर शरद पवार यांनी दिले आहे. त्यांचे उत्तर भाजपसाठी अलार्म तर नाही ना?

विरोधकांकडे तरुण चेहरा

2019 आणि 2024 मधील दोन निवडणुकीतील एक ठळक फरक शरद पवार यांनी मुलाखतीत सांगितला. मोठ्या प्रमाणात तरुणांची सक्रियता. सध्या त्यांच्या खेम्यात तरुण चेहरे आहेत. गेल्यावर्षीपेक्षा अधिक तरुणाई आपल्या गोटात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकारणात तरुणाई कुणाच्या बाजूने आहे, हे अप्रत्यक्षपणे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

जनता सरकारची आठवण

या मुलाखती दरम्यान शरद पवार यांनी जनता सरकारची आठवण काढली. सध्याची परिस्थिती अगदी तशीच असल्याचे ते म्हणाले. जनता पक्षाने 1977 साली केंद्रात सत्ता मिळवली होती. हे सरकार निवडणुकीनंतर विविध पक्षांच्या सहकार्याने स्थापित झाले होते. याकडे त्यांनी लक्ष वेधले. सध्या विरोधकांनी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर केला नाही. जनता पक्षाच्या काळात मोररजी देसाई यांचे नाव निवडणुकीनंतर समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधक आले एकत्र

देशात सध्या काय स्थिती आहे. राजकारणाचा मूड काय आहे, याविषयी शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले. 2019 आणि 2024 मधील परिस्थितीचे विश्लेषण करताना, त्यांनी भाजपवर बॉम्ब टाकला. ज्यांना भाजप आणि नरेंद्र मोदी आवडत नाहीत असा राजकीय पक्षांचा, विचारांचा एक वर्ग एकत्रित येत आहे, असे विधान त्यांनी केले.

देश का मूड मोदी के खिलाफ

हीच कडी पकडत त्यांनी भाजपवर बॉम्ब टाकला. देशाचा मूड सध्या मोदी विरोधात जात असल्याचे मोठे वक्तव्य त्यांनी केले. विरोधकांसाठी अनुकूल वातावरण आहे. या सकारात्मक वातावरणात आम्ही गांधी आणि नेहरुंचा वारसा जपणारे, पुढे जात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी या मुलाखतीत अनेक मुद्यांना हात घातला. त्यांनी काँग्रेससोबतची अनेक प्रादेशिक पक्ष कदाचित काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली.

Non Stop LIVE Update
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका.
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?.
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय.