INDvsPAK WWC 2022: ‘या’ चौघींच्या सुपर कामगिरीमुळे वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला चारली धूळ

मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघाने पाकिस्तान विरोधात विजयाचा आपला सिलसिला कायम राखला आहे.

Mar 07, 2022 | 2:36 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 07, 2022 | 2:36 PM

मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघाने पाकिस्तान विरोधात विजयाचा आपला सिलसिला कायम राखला आहे. भारतीय संघाने तब्बल 108 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाने विजयासाठी 245 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण पाकिस्तानचा डाव अवघ्या 137 धावांमध्ये आटोपला. भारताच्या विजयाच श्रेय चार खेळाडूंना जातं.

1 / 5
ऑलराऊंडर पूजा वस्त्रकारने 59 चेंडूत 67 धावांच्या खेळीत आठ चौकार फटकावले. या दोघींच्या झंझावती फलंदाजीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

2 / 5
सर्वच भारतीय महिला गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. पण त्यात राजेश्वरी गायकवाड उजवी ठरली. तिने आपल्या फिरकी गोलंदाजीने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला. राजेश्वरीने 10 षटकात 31 धावा देत  चार विकेट घेतल्या. झुलन गोस्वामी, स्नेह राणाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

3 / 5
स्नेह राणाने 48 चेंडूत 53 धावांच्या खेळीत चार चौकार लगावले. पूजा आणि स्नेहमध्ये 97 चेंडूत 122 धावांची भागीदारी झाली. स्नेहने गोलंदाजीतही चमक दाखवली. तिने दोन विकेट घेतल्या.

4 / 5
सलामीवीर शेफाली वर्मा (Shafali Verma) भोपळाही न फोडता तंबूत परतली. पण त्यानंतर सांगलीच्या स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) कमालीचा खेळ दाखवत डाव सावरला. डावखुऱ्या स्मृतीने दीप्ती शर्मासोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. स्मृतीने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें