सेकंड हँड कार का घेऊ नये? जाणून घ्या 5 प्रमुख कारणं

अक्षय चोरगे

| Edited By: |

Updated on: Mar 22, 2021 | 7:59 AM

आज आम्ही तुमच्यासमोर अशी 5 कारणे घेऊन आलो आहोत जी तुम्हाला सेकंड हँड कार का खरेदी करू नये, ही बाब पटवून देतील.

Mar 22, 2021 | 7:59 AM
बरेच ग्राहक कमी किंमतीत उत्कृष्ट सेकंड हँड कार खरेदी करतात, परंतु काही काळानंतर, त्यांच्या कारमध्ये काही अडचणी येऊ लागतात, किंवा कारमध्ये बिघाड होतो. त्यानंतर कार दुरुस्तीसाठी बरेच पैसे खर्च होतात. त्यामुळे कारची किंमत नवीन कारइतकीच बनते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासमोर अशी 5 कारणे घेऊन आलो आहोत जी तुम्हाला सेकंड हँड कार का खरेदी करू नये, ही बाब पटवून देतील.

1 / 6
इंस्पेक्शन शिवाय गाडी घेऊ नका : जर कार मालक आपल्याला कारची तपासणी करण्याची परवानगी देत ​​नसेल तर आपण कार खरेदी करू नये. ही बाब स्पष्टपणे दर्शविते की त्याला त्याच्या गाडीची कमतरता लपवायची आहे.

2 / 6
ओडोमीटरचं चुकीचे रीडिंग - तुम्ही कार घेण्यासाठी गेल्यानंतर तुम्हाला ओडोमीटरचं रीडिंग चुकीचं किंवा विचित्र दिसलं तर तुम्ही त्वरित कार मालकास नकार द्यायला हवा. त्याच वेळी, तुम्ही कार चालवून पाहावी. कारण बर्‍याच वेळा ओडोमीटर कारचे अचूक रीडिंग सांगत नाही.

3 / 6
सर्व्हिस रेकॉर्ड - कारच्या मालकाकडे सर्व्हिस रेकॉर्ड नसल्यास आपण कार घेऊ नये. कारण वाहनाचे कोणते भाग बदलले आहेत हे आपल्याला कळू शकणार नाही. त्याच वेळी, आपण कारच्या मालकास कारची किंमत कमी करण्यास देखील सांगू शकता.

4 / 6
टेस्ट ड्राइव्ह - कोणताही वाहन मालक आपल्याला टेस्ट ड्राइव्ह नाकारणार नाही. जर कोणी असे केले तर, समजून जा की त्याच्या कारमध्ये काहीतरी दोष आहे आणि तो आपल्याला कारची खरी कंडिशन (स्थिती) काय आहे ते सांगू इच्छित नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्या कार मालकास नकार देऊ शकता.

5 / 6
नो वॉरंटी - जर कार मालकाकडे कारची वॉरंटी नसेल तर आपण ती कार घेऊ नये. जर त्याच्याकडे वॉरंटी असेल तर ती खरी आहे का, हेदेखील तपासून पाहा

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI