Marathi News » Photo gallery » A huge fire broke out on the express in Nandurbar, the fire was contained after an hour and a half
Fire in Gandhidham Puri Express | नंदुरबारमध्ये एक्स्प्रेसला भीषण आग, तब्बल दीड तासानंतर आग आटोक्यात
आग विझवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे कुठलीही उपाययोजना नसल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचं काम सुरू केलं तब्बल दीड तासानंतर आग आटोक्यात आली आहे.
नंदुरबारमध्ये गांधीधाम एक्सप्रेसला आग लागली आहे. नंदुरबार स्थानकात एक्सप्रेस पोहोचण्यापूर्वीच भीषण आग लागल्याने प्रवाशी प्रचंड हादरून गेले. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली.
1 / 5
जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली. काही प्रवाशांनी तर घाबरून आरडाओरड सुरू केली. किंचाळ्या आणि गोंगाटामुळे एक्सप्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला.
2 / 5
भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेल्या धुराच्या लोटामुळे काही प्रवाशांना तर श्वास घेण्यासही त्रास झाला. स्टेशन जवळ आल्याने एक्सप्रेसचा स्पीड कमी होता.
3 / 5
अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली आहे. तसेच या एक्सप्रेसमधून प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.नंदुरबार स्थानकाजवळ अचानक आग लागली या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. गांधीधाम पुरी एक्सप्रेस चा आग लागलेल्या डब्याला रेल्वे ट्रॅक वरून बाहेर काढण्यात आला आहे.
4 / 5
आग विझवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे कुठलीही उपाययोजना नसल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचं काम सुरू केलं तब्बल दीड तासानंतर आग आटोक्यात आली आहे. रेल्वे कडून सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जलद उपाय योजना सुरू करण्यात आली आहे.