AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या मुलाला घेऊन जा, तो मारून टाकेल; आईची पोलिसांना विनंती, खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात आता मोठी माहिती समोर येताना दिसत आहे.

| Updated on: Mar 24, 2026 | 5:31 PM
Share
राज्यात अशोक खरात या प्रकरणाने खळबळ माजली आहे. 18 मार्च रोजी पोलिसांनी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अशोक खरातला अटक केली. एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासात त्याच्या इतर कुकृत्यांची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत त्याच्यावर लैंगिक छळाचे सहा गुन्हे दाखल झाले असून, सोमवारी आणखी दोन महिलांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. विधी करण्याच्या बहाण्याने तो महिलांचा लैंगिक छळ कसा करत होता, याचा सविस्तर खुलासा या फिर्यादींमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर येत आहे.

1 / 7
अशोक खरातला अटक करण्यामागे पोलिसांनी रचलेला चांगला सापळा आणि गोपनीय कारवाई महत्त्वाची ठरली. पोलिसांना खरात परदेशात पळून जाण्याची भीती होती. त्यामुळे अटकेपूर्वी आठ-दहा दिवस आधीपासूनच शिर्डी पोलिसांनी त्याच्या बंगल्याबाहेर साध्या वेशातील कर्मचारी तैनात केले होते. त्याच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते.

2 / 7
अशोक खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवने त्याच्या काळ्या कृत्यांचे अनेक व्हिडीओ शूट केले होते. ही माहिती खरातला समजताच त्याने नीरजवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. शिर्डी येथील एका तरुणीच्या मदतीने त्याने नीरजला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्नही केला. या खोट्या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर शिर्डी पोलिसांना खरातवर संशय आला आणि त्यांनी नीरजचा शोध सुरू केला. पोलिसांचे पथक जेव्हा नीरजच्या घरी पोहोचले, तेव्हा त्याच्या आईने भीतीने पोलिसांना सांगितले, “माझ्या मुलाला घेऊन जा, नाहीतर खरात त्याचा खून करेल!”

3 / 7
आईच्या या विनंतीनंतर पोलिसांनी तातडीने नीरजशी संपर्क साधला आणि त्याला सुरक्षित ठिकाणी हलवले. नीरजकडे असलेले व्हिडीओ आणि इतर महत्त्वाचे पुरावे यांच्या आधारे शिर्डी पोलिसांनी खरातविरुद्ध सापळा रचला.

4 / 7
७ मार्च ते १४ मार्च या कालावधीत शिर्डी पोलिसांच्या चार कर्मचाऱ्यांनी दोन शिफ्टमध्ये खरातच्या बंगल्याबाहेर साध्या वेशात २४ तास नजर ठेवली. कोण त्याला भेटायला येत होते, कोणती वाहने ये-जा करत होती, तो कधी बाहेर पडतो आणि कुठे जातो, याची सविस्तर माहिती गोळा करण्यात आली. त्याचा पाठलाग करण्यासाठी विशेष वाहनांचाही वापर करण्यात आला.

5 / 7
खरात परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्री झाल्यावर ९ मार्च रोजी त्याला शिर्डीतील गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आणि १० मार्च रोजी त्याच्याविरुद्ध लुक-आऊट नोटीस जारी करण्यात आली. यामुळे त्याचा परदेश पळून जाण्याचा प्लॅन पूर्णपणे फसला. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये शिर्डी पोलिसांनी नाशिक पोलिसांना कोणतीही माहिती न देता स्वतंत्रपणे आणि अत्यंत गोपनीयतेने कारवाई केली. वेळीच ही कारवाई झाल्यामुळे खरात देशाबाहेर जाता आले नाही.

6 / 7
प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. महिला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली SIT पुढील तपास करत आहे. शिर्डी पोलिसांनी गोळा केलेले सर्व पुरावे आता SIT कडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

7 / 7
Follow Us
मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
Congress on Eknath Shinde- PM Modi | जोडे का नाही काढले?; मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंचा नेता...
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या बड्या नेत्याची हजेरी, थेट...
सुरेश धस यांनी शिव्या का दिल्या? अखेर कार्यालयाकडून मोठं स्पष्टीकरण
Suresh Dhas | सुरेश धस यांनी शिव्या का दिल्या? अखेर कार्यालयाकडून मोठं स्पष्टीकरण
फुटीर खासदारांसोबतच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा भाजपच्या...
फुटीर खासदारांसोबतच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा भाजपच्या वरिष्ठांना भेटणार, कारण...
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का?
Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का? उद्धव ठाकरे यांचा सवाल
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत...
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान
फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!
Uddhav Thackeray | फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरे एका वाक्यातच म्हणाले
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच दिली कोर्टातील सुनावणीबाबत मोठी प्रतिक्रिया
आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... PM मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
PM Narendra Modi Live: आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... IIT दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
Umesh Patil on NCP | दादांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात...; उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन