आलिया आणि रणबीरसाठी ख्रिसमसचा दिवस खूप खास ठरला. कपूर कुटुंबासोबत ख्रिसमस लंच केल्यानंतर आलिया भट्टनं रणबीर कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ख्रिसमस डिनर आयोजित केला होता. या सेलिब्रेशनमध्ये आलियाचे आई-वडील, रणबीरची आई आणि मोठी बहीण रिद्धिमाच्या कुटुंबातील सदस्य सामील झाले होते.
1 / 5
आलिया भट्टची आई सोनी राझदान यांनी या ख्रिसमस डिनरचं आयोजन केलं होतं. रणबीर कपूर, त्याची आई नीतू कपूर ,बहीण रिद्धिमा कपूर साहनी, तिचा नवरा भरत साहनी आणि मुलगी समारा साहनीसुद्धा उपस्थित होते. या सर्व व्यतिरिक्त दिग्दर्शक अयान मुखर्जीही या पार्टीत दिसले.
2 / 5
रिद्धिमा कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत.
3 / 5
रिद्धिमा कपूरनं तिचा नवरा भरत साहनी, मुलगी समारा आणि आई नीतू कपूरसोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
4 / 5
ख्रिसमसच्या निमित्ताने रिद्धिमाने ब्लॅक ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.