Marathi News Photo gallery AC Electricity Bill Calculator 1.5 Ton AC Electricity Consumption know your estimate
दररोज 10 तास AC वापरला तर वीज बील किती येईल?
वाढत्या उन्हामुळे एसीचा वापर वाढला आहे. १.५ टन एसी दिवसात १० तास वापरल्यास किती वीजबिल येईल? UPPCL चा वीज वापर कॅल्क्युलेटर वापरून आपण हे सहजपणे काढू शकतो.
सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे घरांमध्ये आणि ऑफिसात एअर कंडीशनर (एसी) चा वापर वाढला आहे.
1 / 8
मे आणि जून महिन्यात अनेक ठिकाणी दिवसातून ८ ते १० तास एसी वापरला जातो.
2 / 8
अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे दीड टन क्षमतेचा एसी असेल आणि दररोज तुम्ही १० तास चालवला तर त्याचे वीज बील किती येऊ शकते? याबाबत माहिती असणे महत्त्वाचे आहे.
3 / 8
उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (UPPCL) ने त्यांच्या वेबसाइटवर एक वीज वापर कॅल्क्युलेटर उपलब्ध करून दिला आहे. या कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही तुमचा एसी दररोज आणि महिन्याला किती युनिट वीज वापरतो हे स्वतः तपासू शकता.
4 / 8
जर तुमच्याकडे १.५ टन क्षमतेचा एसीची पॉवर साधारण २२५० वॅट्स इतकी असते.
5 / 8
UPPCL च्या कॅल्क्युलेटरनुसार, जर हा एसी दररोज १० तास वापरला तर महिन्याभरात अंदाजे ६७५ युनिट वीज वापरली जाईल.
6 / 8
आता जर आपण प्रति युनिट सरासरी ७ रुपये वीज दर गृहीत धरला आणि १.५ टन एसी १० तास दररोज चालवल्यास अंदाजे महिन्याचे वीज बिल ४ हजार ७२५ रुपये येऊ शकते.
7 / 8
त्यामुळे, जर तुम्ही या उन्हाळ्यात एसीचा वापर करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या एसीच्या क्षमतेनुसार आणि वापरानुसार वीज बिलाचा अंदाज घेण्यासाठी UPPCL च्या कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चाचे नियोजन करणे सोपे जाईल.