Glowing Skin: चमकदार त्वचेसाठी थंडीच्या दिवसात आहारात करा या फळांचा समावेश

भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Nov 30, 2022 | 10:05 AM

Nov 30, 2022 | 10:05 AM
थंडीच्या दिवसांत चमकदार, ग्लोइंग स्किन हवी असेल तर आहारात काही फळांचा समावेश करू शकता. या फळांमध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात, जे त्वचेचे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या इजेपासून संरक्षण करतात. हेल्दी व निरोगी त्वचा हवी असेल तर आहारात या फळांचा अवश्य समावेश करा.

1 / 5
आवळा - थंडीच्या दिवसांत आवळा भरपूर मिळतो. त्यामध्ये व्हिटॅमिन सी हे असते, तसेच अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्मही असतात. ज्यामुळे आपले रक्त शुद्ध होते. आवळा खाल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. तुम्ही आवळा कच्चा खाऊ शकता किंवा ज्यूस स्वरुपातही त्याचे सेवन करू शकता.

2 / 5
संत्र - हिवाळ्यात तुम्ही संत्र्याचे सेवन करू शकता. त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच फायबरही असते. दररोज संत्र खाल्ल्याने त्वचेवर नैसर्गिकरित्या चमक येते.

3 / 5
डाळिंब - डाळिंबामध्ये आयर्न म्हणजेच लोह हे भरपूर प्रमाणात असते. तसेच व्हिटॅमिन ई हेही असते. हे त्वचा चमकदार बनवण्यास मदत करते. डाळिंब खाल्याने शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही.

4 / 5
द्राक्षं - तुम्ही द्राक्षं स्वच्छ धुवून नुसती खाऊ शकता किंवा त्याचा ज्यूस करूनही पिऊ शकता. त्यामध्ये फ्लावोन्वाइनड असतात. द्राक्षांचे सेवन आपल्या त्वचेचे यूव्ही किरणांपासून (अतिनील किरणे) संरक्षण होते. द्राक्षांमुळे आपल्या त्वचेवर नैसर्गिक रित्या चमक येते.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI