AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविवारी मंदिरात जायचो, तिथं… भोंदूबाबा अशोक खरातच्या कथित मॅनेजरचा मोठा दावा

भोंदूबाबा अशोक खरातचा कथित मॅनेजर रमेश हिंगे हा सर्वांसमोर आला आहे. त्याने केलेल्या दाव्यानंतर राज्यात खळबळ माजली असून या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आता नेमकं काय? चला जाणून घेऊया...

| Updated on: Mar 25, 2026 | 4:50 PM
Share
नाशिकमधील लिंगपिसाट अशोक खरातबाबत अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. त्याच्या विरोधात सात गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात खरातच्या काळ्या कारनाम्यांची अख्खी कुंडली वाचून दाखवली. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अशोक खरातचा कथित मॅनेजर समोर आला आहे.

1 / 6
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पुन्हा एक मोठा ट्विस्ट आला आहे. खरातचा कथित पीए किंवा मॅनेजर असल्याच्या चर्चेत असलेले रमेश हिंगे आज अचानक मीडियासमोर आले आणि त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पुन्हा एक मोठा ट्विस्ट आला आहे. खरातचा कथित पीए किंवा मॅनेजर असल्याच्या चर्चेत असलेले रमेश हिंगे आज अचानक मीडियासमोर आले आणि त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

2 / 6
रमेश हिंगे यांचा मोठा दावा आहे की, “मी अशोक खरातचा पीए किंवा मॅनेजर नाही. माझा त्याच्याशी कोणताही व्यावसायिक संबंध नाही. मी फक्त रविवारी मंदिरात जात असे...”

रमेश हिंगे यांचा मोठा दावा आहे की, “मी अशोक खरातचा पीए किंवा मॅनेजर नाही. माझा त्याच्याशी कोणताही व्यावसायिक संबंध नाही. मी फक्त रविवारी मंदिरात जात असे...”

3 / 6
रमेश हिंगे यांनी स्पष्ट केले की, ते पेशाने शिक्षक आहेत. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने ते श्रद्धेपोटी मंदिरात स्वयंसेवक म्हणून काम करायचे. “त्या पलीकडे खरातच्या कोणत्याही अघोरी कृत्यांशी किंवा व्यवहारांशी माझा काहीही संबंध नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

4 / 6
गुन्हा दाखल झाल्यानंतर रमेश हिंगे फरार असल्याच्या चर्चा जोरात होत्या. मात्र आज स्वतःहून समोर येऊन त्यांनी आपली बाजू मांडली आहे. पोलिस आता हिंगे यांच्या या दाव्याची सखोल शहानिशा करणार आहेत. खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ आणि इतर आर्थिक व्यवहारांमध्ये हिंगे यांचा खरोखरच सहभाग होता की ते केवळ एक साधे भक्त होते, हे लवकरच स्पष्ट होईल.

5 / 6
दरम्यान, अशोक खरातने अवघ्या १०-१२ वर्षांत १५०० कोटी रुपयांची मालमत्ता उभी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक सायबर सेलने आता NATGRID या शक्तिशाली अॅप्लिकेशनच्या मदतीने खरातच्या बँक खात्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?