सोशल मीडियावर सध्या छत्रपती संभाजीराजे यांचा एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो पाहून सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल. कदाचित तो फोटो तुम्हाला बुचकळ्यातही पाडेल. फोटोतील व्यक्ती संभाजीराजे तर नाहीत ना? असा विचार तुमच्या मनात येऊन जाईल. फोटो निरखून बघितल्यावर फोटोतील व्यक्ती नक्कीच संभाजीराजे हेच आहेत, या मतावर तुम्ही ठाम व्हाल. त्यानंतर संभाजीराजेंच्या या साधेपणाचा तुम्हाला अभिमान वाटेल. एक राजघराण्याचा माणूस, छत्रपतींचा वंशज जेव्हा रायगडाच्या एका झोपडीत विसावा घेतो, तेव्हा ते दृश्य बघून अभिमान वाटणं हे साहजिकच आहे. सध्या संभाजीराजेंचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.