Wedding Look | लग्नसराईत सुंदर दिसायचंय? ट्राय करा बॉलिवूड दिवांचे ‘सारी लूक’!

तुम्हाला साड्या परिधान करायला आवडत असतील तर बॉलिवूड अभिनेत्रींच्या या साड्या आणि स्टाईल तुम्हाला नक्की आवडतील.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:34 PM, 13 Jan 2021
तुम्हाला साड्या परिधान करायला आवडत असतील तर बॉलिवूड अभिनेत्रींच्या या साड्या आणि स्टाईल तुम्हाला नक्की आवडतील.
अभिनेत्री कीर्ती कुल्हारीची साडी नेसण्याची स्टाईल एकदम हटके आहे. कीर्तीने पांढऱ्या रंगाची प्रिंटेड साडी परिधान केली होती. फुल स्लीव्ह्स ब्लाऊजसह ही साडी छान वेगळ्या लुक देईल.
या साडी लूकमध्ये तापसीही खूपच सुंदर दिसत आहे. या लग्नाच्या हंगामात तुम्हाला साडी नेसायची असेल, तर तुम्ही तापसीचा लूक ट्राय करू शकता. ग्रीन प्रिंटेड साडी आणि रेड ब्लाऊजमध्ये तापसी खूपच सुंदर दिसत आहे.
श्रद्धा कपूरने पिवळ्या रंगाची प्रिंटेड साडी परिधान केली आहे. त्यासोबत पिवळा मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे. या लूकला आणखी उठावदार करण्यासाठी तिने ‘माँगटिका’ परिधान केला आहे.
कृती खरबंदाही पिवळ्या रंगाच्या’ कांजीवाराम साडी आणि लाल ब्लाऊजच्या साध्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
कियारा अडवाणीने गोल्डन कलरची साडी परिधान केली असून, मॅचिंग ब्लाऊज देखील घातला आहे. खुल्या केसांमध्ये कियाराचा लूक बर्‍यापैकी ग्लॅमरस दिसत आहे