हळदी आणि मेहंदीनंतर सायंकाळी एका खास संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये काही बाॅलिवूड सेलिब्रिटी देखील उपस्थित राहणार आहेत.
Feb 05, 2023 | 3:02 PM
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या शाही विवाह सोहळ्यामुळे प्रचंड चर्चेत आहेत. उद्या म्हणजेच ६ फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियारा हे दोघे लग्नबंधणात अडकणार आहेत.
1 / 5
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा शाही विवाह सोहळा हा राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये पार पडणार आहे. काल मुंबईहून कियारा अडवाणी आणि दिल्लीहून सिद्धार्थ मल्होत्रा जैसलमेरकडे रवाना झाले.
2 / 5
आज रविवारपासूनच कियारा आणि सिद्धार्थ यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू होतील. सर्वात अगोदर गणेशाची स्थापना होईल आणि मेहंदी आणि हळदीचे कार्यक्रम सुरू होतील.
3 / 5
सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी
4 / 5
यासर्व कार्यक्रमानंतर ६ फेब्रुवारीला सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नबंधणात अडकतील. विशेष म्हणजे त्यानंतर एका जंगी पार्टीचे सायंकाळी आयोजनही करण्यात आले आहे.