AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priya Marathe: कॅन्सरने तिचं शरीर…; प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहेरे झाली भावूक, लिहिली खास पोस्ट

Priya Marathe Death: अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे भावूक झाली आहे. तिने सोशल मीडियावर प्रियाचे काही खास फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. प्रार्थना काय म्हणाली वाचा...

| Updated on: Sep 01, 2025 | 12:43 PM
Share
अभिनेत्री प्रिया मराठेचे 31 ऑगस्ट रोजी पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. काल, वयाच्या 38व्या वर्षी तिने मीरा रोड येथील घरात अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रियाची जवळची मैत्रिण प्रार्थना बेहेरेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

1 / 6
प्रार्थनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रियाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत ती भावूक झाल्याचे दिसत आहे. प्रिया आणि प्रार्थना या काही काळ एकाच घरात रहात होत्या. तिच्या आठवणीत प्रार्थनाला अश्रू अनावर झाले आहेत.

2 / 6
"प्रिया , पियू , परी , प्री , ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती, ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याच्याची मैत्रीण होती. माझी वेडे... आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं. कितीतरी वेळा आम्ही तासन्‌तास बोलत बसायचो… मॅगी, भुर्जी, कॉफी… हे सगळं आमचं छोटंसं जग होतं. खूप साऱ्या गप्पा, काहीसं वेडं हसणं, रात्री उशिरा पर्यंत जागणं – त्या क्षणांना काही तोड नाही" असे प्रार्थना म्हणाली.

3 / 6
पुढे तिने पोस्टमध्ये लिहिले की, "ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती – आणि खरी सख्खी मैत्रीण. तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं. तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं, हसावं, रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं. अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा सर्व काही नवीन, अनोळखी आणि वाटायचं, तेव्हा तिचं हसतं मुख, तिचं प्रेमळ बळ माझ्यासोबत होतं. तिच्यासोबत मी पहिला सीन केला, पहिल्यांदा camera शेअर केला , ती इतकी हसमुख , प्रामाणिक, भावनाशील आणि जिव्हाळ्याने भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला, तरी तो कायमचा लक्षात राहिला."

4 / 6
"कॅन्सरशी लढा देत असताना, एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली. तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती. मी, ती आणि शाल्मली — आम्ही तिघींनी एकत्र इतका सुंदर वेळ घालवला की तो क्षण कायमचा मनात कोरला गेला आहे. ती खूप आनंदी होती… तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं, तुझं घर, तुझं वातावरण, तुझे हे कुत्रे… हे सगळं मला बरे करतंय. मला इथे येऊन बरं वाटतंय… जणू काही हे ठिकाणच मला heal करतंय."

5 / 6
शेवटी प्रार्थना म्हणाली, "कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण तिचं मन, तिचा आत्मा, तिचं खंबीरपणं – ते कोणतंही आजार हरवू शकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं. ती गेली, पण तिच्या आठवणी, तिचं हास्य, तिचं अभिनयातलं तेज — सगळं अजूनही माझ्यासोबत आहे. माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबतच गेला आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे.. कायमचा."

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.