राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारनं 15 दिवसांसाठी संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संचारबंदीला काल पासून सुरुवात देखील झाली. मात्र नाशिकमध्ये या संचारबंदीचे नियम पाळण्यात येत नसल्याचं चित्र आहे.
1 / 6
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने कोरोनाची दुसरी लाट आली आहे ही कोरोनाची लाट आल्याने आरोग्य विभागासह राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी ही संचारबंदी आहे. मात्र नाशिकच्या रामकुंडावर पूजाविधीसाठी मोठी गर्दी होताना दिसतेय.
2 / 6
तसेच या ठिकाणी पोलीस आणि नगरपालिका प्रशासनकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
3 / 6
सोबतच याठिकाणी कोरोना नियमांचं पालन सुद्धा होत नसल्याचं चित्र आहे.
4 / 6
काल दिवसभरात 58 हजार 952 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही गर्दी नाशिककरांची डोकेदुखी वाढवणार की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय.