DRDO चा मनुष्यविरहित UAV विमान उड्डाणाचा प्रयोग यशस्वी ; वाचा सविस्तर

या UAV चे डिझाईन DRDO अंतर्गत बेंगळुरू येथील प्रमुख संशोधन प्रयोगशाळा एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE) ने तयार केले आहे. त्याचा विकासही एडीईने केला आहे. हे एक छोटे मानवरहित विमान आहे. यात टर्बोफॅन इंजिन आहे.

Jul 01, 2022 | 3:03 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Jul 01, 2022 | 3:03 PM

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (डीआरडीओ) अत्याधुनिक मानवरहित विमान विकसित  करण्यात एक मोठे यश मिळाले आहे. DRDO ने स्वायत्त फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरचे पहिले उड्डाण यशस्वीरित्या पार पाडले आहे.

1 / 6
वैमानिकाशिवाय उड्डाण केलेल्या या विमानाने उड्डाण करण्यापासून ते लँडिंगपर्यंतची सर्व कामे ऍटोमिटीक करण्यात आली.कर्नाटकातील चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये आज हायशस्वी प्रयोग करण्यात आला.

2 / 6
एएनआय या वृत्तसंस्थेने  दिलेल्या  माहितीनुसार  डीआरडीओने निवेदनात म्हटले आहे की, या चाचणीच्या वेळी विमानाचे उड्डाण खूप चांगले होते. हे उड्डाण पूर्णपणे स्वयंचलित होते. यामध्ये टेक-ऑफ, वे पॉइंट नेव्हिगेशन आणि स्मूथ टचडाउन सिस्टीमचा  समाविष्ट आहे. हे उड्डाण भविष्यातील मानवरहित विमानाच्या विकासासाठी महत्त्वाचे तंत्रज्ञान साध्य करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. अशा धोरणात्मक संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

3 / 6

DRDO अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या UAV चे डिझाईन DRDO अंतर्गत बेंगळुरू येथील प्रमुख संशोधन प्रयोगशाळा एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE) ने तयार केले आहे. त्याचा विकासही एडीईने केला आहे.

4 / 6
हे एक छोटे मानवरहित विमान आहे. यात टर्बोफॅन इंजिन आहे. एअरफ्रेम आणि अगदी खालची रचना, चाके, उड्डाण नियंत्रण आणि एव्हीओनिक्स प्रणाली या सर्व गोष्टी भारतात बनवल्या जातात.

5 / 6
डीआरडीओच्या या यशस्वी प्रयोगाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, चित्रदुर्ग एटीआरच्या वतीने ऑटोनॉमस फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरच्या पहिल्या यशस्वी उड्डाणाबद्दल अभिनंदन.  स्वायत्त विमाने तयार करण्याच्या दिशेने ही मोठे पाऊल  आहे. यामुळे महत्त्वाच्या लष्करी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने स्वावलंबी भारत मोहिमेचा मार्ग मोकळा होईल.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें