PHOTO : नैसर्गिकरित्या केस स्ट्रेट करायचेय?; मग ‘या’ ट्रिक्स वापराच !

पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करण्यासाठी महिला बरेच पैसे घालतात. मात्र, आज आम्ही काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे केस स्ट्रेट होतील.

1/5
Hair Care
पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करण्यासाठी महिला बरेच पैसे घालतात. मात्र, आज आम्ही काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे केस स्ट्रेट होतील. केस स्ट्रेट पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक कप दूध आणि एक अंड लागणार आहे. एक कप दुधात अंडी मिक्स करा आणि हा पॅक ब्रशने केसांवर लावा. अर्ध्या तासांसाठी पॅक केसांवर ठेवा आणि त्यानंतर फक्त शैम्पूने आपले केस धुवा. हा पॅक लावल्याने केस स्ट्रेट होतील.
2/5
Hair
कोरफड केसांच्या वाढीस मदत करते. कुरळे केस स्ट्रेट करण्यासाठी आपल्याला अर्धा कप नारळ तेलामध्ये अर्धा कप कोरफड मिसळावी लागेल. हे मिश्रण आपल्या केसांवर लावा. एक तास तसेच सोडा. त्यानंतर शैम्पूने आपले केस धुवा.
3/5
hair Lemon is beneficial
अॅपल व्हिनेगर एक नैसर्गिक क्लीन्सर म्हणून ओळखले जाते. हे केसांवर लावण्याने केवळ केस चांगले आणि मऊ राहतात. केस स्ट्रेट करण्यासाठी दोन कप पाण्यात 3 चमचे अॅपल व्हिनेगर घालावे. त्यानंतर अर्ध्या तासांनी केस धुवा. यामुळे आपले केस स्ट्रेट होण्यास मदत होईल.
4/5
Hair Care
मुलतानी माती हे केसांसाठी एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर मानले जाते. हा पॅक बनवण्यासाठी दोन चमचे मुलतानी माती पावडर घ्या आणि त्यात थोडेसे पाणी घालून जाड पेस्ट बनवा. आता हा पॅक आपल्या केसांमध्ये लावा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.
5/5
hair Care tips
नारळाचे दूध आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते. अर्धा कप नारळाचे दूध घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या केसांना लावा. वीस ते तीस मिनिटांनंतर आपले केस थंड पाण्याने धुवा. (टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)