फुलांची आरस, नेत्रदीपक सजावट, मंत्रोच्चार; मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन थाटात, फोटो वेधतील लक्ष

Ganpati Bappa Morya : आज गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाले. वाजत गाजत विधीवत प्रतिष्ठापना झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांच्या घरी आज बाप्पांचे आगमन झाले. सहकुटुंब त्यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले.

| Updated on: Sep 07, 2024 | 5:40 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले. यावेळी झेंडूच्या फुलांची सजावट, विविध फुलांची आरस चित्त वेधून घेत होते. मुख्यमंत्र्यांसह त्यांचा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पण गणरायाची पूजा केली.

1 / 6
राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मूळ गावी नाथरा मध्ये सपत्नीक गणेशाची स्थापना केली..राज्यावरील विघ्न दूर करण्याची मागणी गणपती बाप्पा समोर केली. आज पासून नाथ प्रतिष्ठानकडून परळीत सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या धूम धडाक्यात होत आहे. शेतकऱ्यांवरील संकट दूर होवू द्या आशी प्रार्थना धनंजय मुंडे यांनी गणपती बाप्पाकडे केली आहे.

2 / 6
 काँगेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या अमरावतीमधील निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले. यावेळी आमदार यशोमती ठाकुर यांनी मनोभावे गणपती बाप्पाची पूजा अर्चना केली. तसेच बळीराजा सुखी समृद्धी होवो अस साकड त्यांनी लाडक्या गणरायाकडे घातलं.

3 / 6
राहाता शहरातील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या गणेश स्थापनेच्या शोभा मिरवणुकीत धनश्री सुजय विखे पाटील यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या वतीने आज गणरायाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम पथक , ढोल - ताशाच्या गजरात भव्य शोभा मिरवणुक काढली. विद्यार्थ्यांनी साहसी खेळाचे केलेले सादरीकरण शहरवासियांचे आकर्षण ठरलं. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहपत्नीक गणरायाची विधीवत पूजा केली

4 / 6
दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या निवासस्थानीही  बाप्पाचे आगमन झाले. दरवर्षी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले जाते. बाप्पाच्या सहवासातले हे पाच दिवस कसे जातात तेही समजत नाही. पण या वर्षी आईच्या स्वर्गवासामुळे बाप्पा दीड दिवसांचाच आहे.अस अडसूळ म्हणाले. पूजाअर्चा करून सर्वांनी बाप्पाची मनोभावे आरती केली.

5 / 6
जागावाटप आणि निकालाआधीच 'अजित पवार' महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो चर्चेत आला आहे. हा फोटो आहे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरी बसवलेल्या गणपतीच्या आरासमधील. मिटकरी यांच्या अकोल्यातील न्यु तोष्णावाल लेआऊट भागातील घरी गणपतीची पारंपारिक पद्धतीने स्थापना करण्यात आली. यावेळी आमदार मिटकरींनी अनवाणी गणपतीची पालखी खांद्यावर घेतली.

6 / 6
Follow us
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....