Marathi News » Photo gallery » Health Tips, nails, science, white spots on nails, causes of white spots on nails
नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी करता सगळ्या गोष्टी, मग नखांच्या आरोग्याकडेही द्या लक्ष; तुमच्या नखांवरही आहे ‘या’ रंगाचा डाग?
Health Tips नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपण प्रत्येक जण काही ना काही करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे. या नखांमध्ये आरोग्याचं रहस्य दडलेलं आहे. डॉक्टर अनेक वेळा नखे पाहून तुम्हाला काही गोष्टी सांगतात. त्यामुळे आपल्या नखांकडे लक्ष द्या. त्यावर काळे, पांढरे किंवा पिवळे डाग दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या
नखांवर डाग असल्यास जुने लोकं त्यांचा संबंध अंधश्रद्धेशी जोडतात. शनिवारी नखे कापली किंवा शनिवारी बेसन किंवा चणे खाल्ल्यामुळे शनिची साडेसाती लागली म्हणून नखांवर डाग पडतात असं म्हणतात. तर तसं नाहीय. नखांमध्ये आरोग्याचं रहस्य दडलेलं असतं. जर तुमच्या नखांवर पांढरे डाग आढळल्यास तुमचा शरीरात कॅल्शियमची कमी आहे, हे लक्षात घ्या. मात्र येवढंच एक कारण नाही आहे. काय आहेत इतर कारणं आज आपण जाणून घेणार आहोत.
1 / 5
काही लोकांच्या नखांवर पांढरे डाग हे तात्पुरत्या स्वरुपात असतात. यालाच ल्युकोनीचिया असं वैज्ञानिक भाषेत म्हणतात. नखांच्या वाढीसोबत नखांवरील हे डाग कालांतराने निघून जातात.
2 / 5
सायन्स फोकसच्या अहवालनुसार नखांवर पांढरे डाग हे खास करुन लहान मुलांमध्ये दिसून येतात. याचं कारण पोषक तत्वाची कमी किंवा कुपोषण. तर काहींना शरीरात रक्तातील प्रथिनची कमीमुळेही पांढरे डाग येतात. बहुतेक लोकांना हे कॅल्शियमची कमी असल्याने नखांवर पांढरे डाग येतात असं वाटतं. मात्र सायन्स फोकसच्या अहवालानुसार यात तथ्य नाहीय.
3 / 5
या रिपोर्टनुसार पांढरे डाग पडण्यामागे शरीरातील खनिजांची कमतरताही हे सर्वात मोठं कारण आहे. एलर्जी, बुरशीजन्य संसर्ग आणि नखांना झालेली दुखापत यामुळे नखे खराब होतात. अशावेळी नखांवर या प्रकारचे डाग दिसतात. मग अशावेळी आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
4 / 5
या रिपोर्टनुसार नखांवर पांढरे डाग पडण्यामागे हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे, एग्जिमा, न्यूमोनिया आणि आर्सेनिक विषबाधा अशीही कारणं असू शकतात. मात्र असे रुग्ण आढळल्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी नखांवरील पांढरा डाग का आला आहे याची माहिती काढा. खास करुन तुमचा डॉक्टरांना एकदा याची माहिती द्या. टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा