IPL 2021 : पृथ्वीचं तडाखेबाज अर्धशतक, बॅटची जादू पाहून गर्लफ्रेंड भलतीच खूश झाली, म्हणाली….

पृथ्वीच्या चेन्नईविरोधातील खेळीने त्याची गर्लफ्रेंड प्राची सिंग भलतीच खूश झाली आहे. तिने इन्स्टग्राम पोस्ट करत पृथ्वीची तारीफ केली आहे. | (IPL 2021 DC vs CSK Prithvi Shaw GirlFriend Prachi Singh)

1/7
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीकडून सलामीला आलेल्या मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने धमाकेदार खेळी करत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. पृथ्वीने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. यात 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता.
2/7
Prithvi Shaw
अॅडलेड कसोटीत खराब कामगिरी करणा पृथ्वी शॉला मालिकेतील इतर सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर, इंग्लंड मालिकेत देखील त्याचा संघात समावेश केला गेला नाही.
3/7
Prithvi Shaw
पृथ्वी शॉ ने पाठीमागच्या सगळ्या गोष्टी विसरुन आपल्या मेहनतीवर लक्ष दिलं. ज्याचा फायदा त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये झाला. त्याने विजय हजारे स्पर्धेत 827 धावांचा रतीब घातला. ज्यानंतर आता आयपीएल सुरु झाल्यानंतर चेन्नईविरोधीत पहिल्याच मॅचमध्ये पृथ्वीने आपल्या बॅटची जादू दाखवली.
4/7
Prithvi Shaw Prachi Singh
पृथ्वीच्या चेन्नईविरोधातील खेळीने त्याची गर्लफ्रेंड प्राची सिंग भलतीच खूश झाली आहे. तिने इन्स्टग्राम पोस्ट करत पृथ्वीची तारीफ केली आहे.
5/7
Prithvi Shaw Prachi Singh
पृथ्वीने काय शानदार सुरुवात केली.... असं म्हणत तिने हार्ट इमोजीही शेअर केली आहे. याअगोदरही प्राचीने पृथ्वीच्या बॅटिंग परफॉरमन्सवर आपली मतं मांडली आहेत.
6/7
Prithvi Shaw
पृथ्वीने आयपीएल स्पर्धा सुरु होण्याअगोदर ट्रेनिंग कॅम्पमधील एक फोटो शेअर केला होता. ज्यावर साक्षीने तुझं हसणं मी मिस करत असल्याचं म्हटलं होतं. त्याचसोबत तिने हार्ट इमोजीही शेअर केला होता.
7/7
Prithvi Shaw
पृथ्वी शॉ गेल्या काही महिन्यांपासून टीकाकारांच्या निशाण्यावर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. अखेर हा धावांचा दुष्काळ चेन्नईविरोधातील मॅचमध्ये संपुष्टात आला. त्याने केवळ 27 चेंडूमध्ये दणदणीत अर्धशतक ठोकलं. अर्धशतकानंतरही त्याने आपला आक्रमक खेळ सुरुच ठेवला. त्याने 38 चेंडूमध्ये 72 धावा ठोकल्या. ज्यामध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. पृथ्वीने चेन्नईविरोधातील शानदार बॅटिंगने टीकाकारांची तोंड बंद केली.