Marathi News » Photo gallery » Kareena kapoor khan back to the set for shooting after one moth of delivery
PHOTO | दुसऱ्यांदा आई बनल्यानंतर ‘बेबो’ पुन्हा शूटला हजर, फिट लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष!
करीना कपूर खानने (Kareena Kapoor khan) तिच्या शूटिंगच्या कमिटमेंट्समध्ये कधीच कोणतेही अडथळे येऊ दिले नाहीयत. तिने करियर आणि गर्भधारणेशी संबंधित रूढी नेहमीच मोडीत काढल्या आहेत.
करीना कपूर खानने (Kareena Kapoor khan) तिच्या शूटिंगच्या कमिटमेंट्समध्ये कधीच कोणतेही अडथळे येऊ दिले नाहीयत. तिने करियर आणि गर्भधारणेशी संबंधित रूढी नेहमीच मोडीत काढल्या आहेत.
1 / 7
करीनाने नेहमीच आनंदाने आपला बेबी बंप फ्लाँट केला आणि ती नेहमीच आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.
2 / 7
दोन्ही गर्भधारणेदरम्यान तिचा फॅशनेबल लूक चर्चेत आला होता. या काळातही करीनाने प्रत्येक ड्रेस अगदी सहजतेने परिधान केला होता. बेबो आपल्या दुसर्या मुलाच्या जन्मानंतर अवघ्या एका महिन्यात पुन्हा कामावर परतली आहे.
3 / 7
आपल्या कामाची कमीटमेंट पूर्ण करण्यासाठी तिला सेटवरहजार झाली होती. यावेळी करीनाने निळ्या रंगाचा फुलांचा ड्रेस परिधान केला होता. तिने डार्क ब्राउन लिप कलरसह मॅट फिनिश मेकअप केला होता. करीनाने नव्या हील्सच्या जोडीने आपला हा लूक पूर्ण केला आणि यावेळी तिच्या केसांचा रंग अत्यंत सुंदर दिसत होता.
4 / 7
अलीकडेच महिला दिनी करीनाने तिच्या दुसर्या मुलाची पहिली झलक इंस्टाग्रामवर सेल्फीमध्ये शेअर केली होती. यासह तिने महिलांना एक संदेश देखील दिला की, ‘ती करू शकत नाही असे काहीही नाही’.
5 / 7
करीनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ती लवकरच 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात अभिनेता आमिर खानसोबत दिसणार आहे.
6 / 7
त्यांचा हा चित्रपट 2021मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्त साधत रिलीज होईल. अद्वैत चंदन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असनू, ‘टॉम हॅन्क्स स्टारर फॉरेस्ट गंप’चा हा अधिकृत रूपांतरण आहे.