Photos : ऋषभ पंतसोबतच्या फोटोने या कॅप्टनची पत्नी चर्चेत, सोशल मीडियावर धुमाकुळ, वाचा कोण आहे ती?

ऑस्ट्रेलियायाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन बॉल टेम्परिंग वादानंतर संघाचा कर्णधार झाल्यापासून तो कायमच चर्चेत असतो. कधी खेळामुळे, तर कधी आपल्या वक्तव्यांवरुन तो चर्चेत असतो.

1/5
ऑस्ट्रेलियायाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन बॉल टेम्परिंग वादानंतर संघाचा कर्णधार झाल्यापासून तो कायमच चर्चेत असतो. कधी खेळामुळे, तर कधी आपल्या वक्तव्यांवरुन तो चर्चेत असतो. त्याचं चर्चेत असणाऱ्याचं आणखी एक कारण त्याची पत्नी देखील आहे. तिचं नाव बॉनी पेन असं आहे. (Pic Credit Bonnie Paine Insta)
2/5
टिम पेन आणि बॉनीचं लग्न एप्रिल 2016 मध्ये झालं होतं. या दोघांना दोन मुलं आहेत. यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं नाव चार्ली आहे आणि मुलीचं नाव मिल्ला आहे. बॉनी सोशल मीडियावर सातत्याने आपल्या मुलांचे फोटो शेअर करत असते. (Pic Credit Bonnie Paine Insta)
3/5
पेनची पत्नी बॉनी एक म्यूजिकल आर्टिस्ट आहे. ती 2006 पासून एलीफंट रिव्हायव्हल नावाच्या म्यूझिक ग्रुपचा भाग आहे. (Pic Credit Bonnie Paine Insta)
4/5
भारतीय टीम 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर केली होती. त्यावेळी बॉनी पेन आपल्या मुलांसोबत भारताचा युवा फलंदाज-विकेटकीपर ऋषभ पंतसोबत फोटोत दिसली. हा फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअरही केला. तसेच पंतला सर्वोकृष्ट बेबीसिटर म्हटलं. (Pic Credit ICC Twitter)
5/5
या फोटोनंतर अचानक इंस्टग्रामवर तिचे फॅन फॉलोविंग वाढली. टिम पेनने स्वतः याचा खुलासा केलाय. तो म्हणाला की यानंतर पत्नीच्या इंस्टाग्रामवर भारतीय फॉलोवर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. (Pic Credit Bonnie Paine Insta)