Palak Jain : मुंबईच्या पलक जैननं पटकावलं ‘स्टार मिस टीन इंडिया 21’चं विजेतेपद

भारताच्या विविध राज्यातून 13 ते 19 वर्षे वयोगटातील 150 हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. (Mumbai's Palak Jain won the 'Star Miss Teen India 21' award)

1/8
मुंबईतील प्रसिद्ध बासरीवादक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पलक जैननं नुकतंच जयपूरमध्ये स्टार एंटरटेनमेंट प्रॉडक्शन आयोजित ‘स्टार मिस टीन इंडिया 21’ या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.

2/8
एक सौंदर्य स्पर्धा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारताच्या विविध राज्यातून 13 ते 19 वर्षे वयोगटातील 150 हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

3/8
ही स्पर्धा जयपूरच्या हॉटेल आमेर येथे आयोजित करण्यात आली होती. फॅशन आणि स्पर्धेच्या क्षेत्रात यशस्वी कसं व्हावं याचे तपशील स्पर्धकांना समजण्यास मदत व्हावी या उद्देशानं स्पर्धेमध्ये प्रशिक्षण आणि ग्रुमिंग सत्रांचा समावेश केला गेला होता.

4/8
अंतिम फेरीसाठी ज्युरी सदस्यांमध्ये ‘मिस्टर वर्ल्ड 2016’ रोहित खंडेलवाल आणि ‘मिस इंडिया 2019’ सुमन राव यांचा समावेश होता.

5/8
पलक जैनची फॅन फॉलोइंग मोठी आहे. तिचं ‘द गोल्डन नोट्स’ नावानं एक YouTube चॅनेल आहे ज्याचे 1.25 दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

6/8
तिला यूट्यूबकडून गोल्डन बटण देऊन ही सन्मानित करण्यात आलं आहे. तिचं चॅनलला 15 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत.

7/8
तिचे बासरीचे अनेक व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असतात आणि तिचा आंतरराष्ट्रीय सुद्धा फॅन बेस आहे. एवढंच नाहीत तर तिला भोपाळ - साधना न्यूज या प्रतिष्ठित वृत्तवाहिनीकडून ‘राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्कार’ आणि हैदराबादच्या सिफा संस्थेकडून "नारी सन्मान" पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे.

8/8
ती सध्या 17 वर्षांची असून 12 व्या वर्गात शिकत आहे. पलक आपल्या यशाचे श्रेय तिचे वडील आणि बासरीवादक सीए. सचिन जैन आणि आई स्मिता जैन यांना देते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI