PHOTO : उस्मानाबादेतील स्मशानभूमीत एकावेळी 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, 8 मृतदेह अंत्यविधीच्या प्रतिक्षेत

उस्मानाबादमधील स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 19 जणांवर एकावेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर जागेअभावी 8 मृतदेहांवर उद्या अंत्यविधी करण्यात येणार आहेत.

  • संतोष जाधव, टीव्ही 9 मराठी, उस्मानाबाद
  • Published On - 19:34 PM, 14 Apr 2021
1/7
राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी राज्यातील विविध शहरातील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
2/7
उस्मानाबादमध्येही दिवसेंदिवस कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उस्मानाबादेतील स्मशानभूमीत एकाचवेळी अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलीय.
3/7
उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या स्मशानभूमीत आज 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार पार पडले. तर 8 मृतदेहांवर अद्यापही अंत्यविधी होणं बाकी आहे.
4/7
स्मशानभूमीत अवघ्या एक - एक फुटाच्या अंतराने सरण रचण्यात आली आहेत. त्यावर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
5/7
मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे काही मृतदेहांवर उशिराने अंत्यसंस्कार करण्याची वेळ येतेय.
6/7
कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांची कमतरता भासत आहे. त्यामुळे एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडंही कमी प्रमाणात वापरली जात आहेत.
7/7
आज सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ न शकल्यामुळे राहिलेल्या मृतदेहांवर उद्या अंत्यविधी करण्यात येणार आहे. उस्मानाबादमधील कोरोना स्थिती अशीच राहिली तर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे.