PHOTO : साताऱ्याच्या खासदारांकडून विकेंड लॉकडाऊन सत्कारणी, हाती विळा घेऊन गहू काढणीसाठी थेट बांधावर!

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी विकेंड लॉकडाऊन सत्कारणी लावत शेतात गहू काढणीच्या कामात मदत केली.

  • दिनकर थोरात, टीव्ही 9 मराठी, कराड, सातारा
  • Published On - 15:12 PM, 10 Apr 2021
1/6
डोक्यावर पांढरी टोपी, पिळदार मिशी, अंगात पांढरा कुर्ता आणि जॅकेट असा पेहराव असलेले साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचं एक वेगळं आणि सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांना आपलं वाटणारं रुप आज पाहायला मिळालं.
2/6
खासदार श्रीनिवास पाटील यांनी विकेंड लॉकडाऊनचा सदुपयोग करत थेट गव्हाच्या रानात पाय ठेवला. इतकच नाही तर हातात विळा घेत त्यांनी गहू काढणीला मदतही केली.
3/6
शरद पवारांची गाजलेली सभा आणि उदयनराजेंचा पराभव करुन देशभरात चर्चेत आलेले श्रीनिवास पाटील आपल्या साधेपणानेमुळेही अनेकांच्या कायम लक्षात राहतात.
4/6
पाटील यांचा हाच साधेपणा आज पुन्हा दिसून आला. हाती विळा घेऊन त्यांनी आपल्या शेतातील गहू काढणीला मदत केली.
5/6
विकेंड लॉकडाऊनमुळे मतदारसंघातील लोक आपल्या समस्या घेऊन येणार नाहीत. मग वेळ कुठे सत्कारणी लावायचा? असा प्रश्न त्यांच्या मनात आला. तेव्हा शेतात गहू काढायचं काम सुरु असल्याचं त्यांना समजलं आणि त्यांनी शेतात जात थेट गहू काढणीच्या कामात स्वत:ला गुंतवून घेतलं.
6/6
यावेळी आपला नेहमीचे पेहराव बाजूला ठेवत पाटील यांनी अंगात टी-शर्ट, साधी पँट आणि डोक्यावर रुमाल गुंडाळून शेतातील गहू काढला.