AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon Blast Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कोण? त्यांच्यावर आरोप काय? जाणून घ्या A टू Z माहिती

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याचा निकाल आज मुंबई उच्च न्यायालयात जाहीर होणार आहे. एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरसह सात आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा मागितली आहे. १७ वर्षे चाललेल्या या खटल्यात आरोपींची सुटका होईल की शिक्षा होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.

| Updated on: Jul 31, 2025 | 11:56 AM
Share
मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला होता. आज मुंबईच्या विशेष न्यायालयात या खटल्याचा निकाल लागणार आहे. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली आहे. जवळपास १७ वर्षे चाललेल्या या खटल्यातील आरोपींची न्यायालय सुटका करणार की त्यांना शिक्षा सुनावली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

1 / 10
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एकूण 8 आरोपींवर खटला चालवण्यात येत आहे. या सर्वांवर दहशतवादी कट रचणे, हत्या आणि स्फोटकांचा वापर केल्याचे आरोप आहेत. यात अभिनव भारत या हिंदू कट्टरपंथी संघटनेचा सहभाग होता.

2 / 10
प्रज्ञा सिंग ठाकूर : साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आरोप आहे. या स्फोटासाठी वापरलेली मोटारसायकल त्यांच्या नावावर होती. बॉम्बस्फोटाच्या कटात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सध्या त्या जामीनावर बाहेर असून त्या भाजपच्या खासदार होत्या.

3 / 10
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित : लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बॉम्बसाठी आरडीएक्स (RDX) मिळवून ते बॉम्ब बनवण्यासाठी पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सद्यस्थितीत तेही जामीनावर बाहेर आहेत.

4 / 10
निवृत्त मेजर रमेश उपाध्याय : निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हे अभिनव भारत या संघटनेचे सदस्य आहेत. त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटात सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

5 / 10
सुधाकर द्विवेदी : तसेच सुधाकर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटासाठी धार्मिक विचारधारेच्या माध्यमातून लोकांना भडकवण्याचे आणि मानसिक पाठिंबा देण्याचे काम त्यांनी केले, असा आरोप होता.

6 / 10
सुधाकर चतुर्वेदी : सुधाकर चतुर्वेदी यांचा बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये सहभाग होता. तसेच चतुर्वेदी यांच्याच घरी बॉम्ब बनवल्याचा आरोपही केला जातो.

7 / 10
समीर कुलकर्णी : तसेच या मालेगाव  बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी समीर कुलकर्णी बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या स्फोटक रसायनांची व्यवस्था केली, असा आरोप त्यांच्यावर आहे.

8 / 10
अजय राहिरकर : अजय राहिरकर हे अभिनव भारत संघटनेचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांनी बॉम्बस्फोटाच्या कटासाठी आर्थिक मदत गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

9 / 10
रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे हे या प्रकरणातील दोन फरार आरोपी आहेत. बॉम्बस्फोटात प्रत्यक्ष सहभाग घेण्यापासून ते बॉम्ब ठेवण्यापर्यंतचे आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी अनेक वर्षे सुनावणी चालली असून आज न्यायालय या प्रकरणाचा निकाल देणार आहेत.

10 / 10
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.