AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वांत श्रीमंत गणपती; तब्बल इतक्या कोटींचा विमा, ऐश्वर्य पाहून विस्फारतील डोळे!

यामध्ये मूर्ती, दागिने, स्वयंसेवक, भाविकांची सुरक्षा आणि इतर मालमत्ता यांचा समावेश आहे. वाढलेल्या सोने-चांदीच्या किमती आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही रक्कम वाढवण्यात आली आहे. हा विमा न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीने उतरवला आहे.

| Updated on: Aug 19, 2025 | 4:24 PM
Share
सध्या महाराष्ट्रात सर्वत्रच गणपतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात जल्लोषात आगमन सोहळा पार पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे घरोघरी बाप्पााच्या स्वागताची, डेकोरेशनची तयारी सुरु आहे. सध्या मुंबईत अनेक ठिकाणी भव्य मंडप उभारले जात आहेत.

1 / 10
आज आपण देशातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळाबद्दल जाणून घेणार आहोत. या गणपती मंडळाने यंदा तब्बल ४७४ कोटी रुपयांचे विमा सरंक्षण घेतले आहे. त्यामुळे नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.

2 / 10
देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत गणपती मंडळांपैकी एक म्हणून जीएसबी सेवा मंडळाला ओळखले जाते. जीएसबी सेवा मंडळाने यंदा गणपती बाप्पाासाठी विक्रमी विमा घेऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे.

3 / 10
हा गणपती बाप्पा माटुंग्यातील किंग्ज सर्कलमध्ये स्थापन केला जातो. या गणपतीसाठी यंदा मंडळाने तब्बल ४७४.४६ कोटी रुपयांचे विमा संरक्षण काढले आहे. गेल्यावर्षी याच मंडळाने ४०० कोटी रुपयांचा विमा घेऊन एक विक्रम केला होता.

4 / 10
मात्र, यंदा सोन्या-चांदीच्या वाढलेल्या किमतींमुळे आणि उत्सव व्यवस्थापनात सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यामुळे ही विम्याची रक्कम वाढवण्यात आली आहे.
न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीतर्फे हा विमा उतरवण्यात आला आहे. ही विमा पॉलिसी केवळ गणपतीच्या मूर्तीसाठी नसून, ती अनेक महत्त्वाच्या बाबींसाठी काढण्यात आली आहे.

मात्र, यंदा सोन्या-चांदीच्या वाढलेल्या किमतींमुळे आणि उत्सव व्यवस्थापनात सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यामुळे ही विम्याची रक्कम वाढवण्यात आली आहे. न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीतर्फे हा विमा उतरवण्यात आला आहे. ही विमा पॉलिसी केवळ गणपतीच्या मूर्तीसाठी नसून, ती अनेक महत्त्वाच्या बाबींसाठी काढण्यात आली आहे.

5 / 10
जीएसबीच्या गणपतीला ६६ किलो सोन्याचे आणि ३३६ किलो चांदीचे दागिने अर्पण केले जातात. या मौल्यवान वस्तूंच्या संरक्षणासाठी ६७ कोटी रुपयांचा सर्व जोखीम विमा घेण्यात आला आहे. २०२४ मध्ये हे मूल्य ४३ कोटी रुपये होते.

6 / 10
या विम्याचा सर्वात मोठा वाटा ३७५ कोटी रुपये इतका आहे. हा विमा उत्सवादरम्यान काम करणारे स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी, सेवक आणि सुरक्षा रक्षक यांच्यासाठी काढण्यात आला आहे.

7 / 10
त्यासोबतच आग, भूकंप यांसारख्या नैसर्गिक धोक्यांसाठी २ कोटी रुपयांचा विशेष विमा काढण्यात आला आहे. तसेच मंडळाला भेट देणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी ३० कोटी रुपयांचा सार्वजनिक दायित्व विमा (Public Liability Insurance) घेण्यात आला आहे.

8 / 10
तसेच मंडपातील फर्निचर, संगणक, सीसीटीव्ही, स्कॅनर आणि इतर वस्तूंच्या संरक्षणासाठी ४३ लाख रुपयांचा अतिरिक्त विमा काढण्यात आला आहे. जीएसबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सध्या सोने-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. या वाढलेल्या किंमतीमुळे विम्याची रक्कम वाढली आहे. गेल्या वर्षी प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ७७,००० रुपये होती. आता ती १,०२,००० रुपये झाली आहे.

9 / 10
मुंबईचा 'तिरुपती' गणपती म्हणून ओळखला जाणारा हा गणपती केवळ ५ दिवसांसाठी असतो, पण या कालावधीत तो लाखो भाविकांना या गणपतीचे दर्शन घेतात. जीएसबी मंडळाने बाप्पाच्या आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.

10 / 10
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.