PHOTO | IPL 2021 स्थगितीमुळे फ्लॉप शो करणाऱ्या ‘या’ खेळाडूंच्या जीवात जीव, कोण आहेत ते क्रिकेटपटू?

कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रकोपामुळे आयपीएलचा 14 मोसम (IPL 2021) 29 सामन्यानंतर रद्द स्थगित करावा लागला.

1/6
David Warner, Eoin Morgan, hardik pandya, IPL 2021, Nicholas Pooran, Ipl, Cricekt, Corona, Covid 19,
कोरोनाच्या वाढच्या संसर्गामुळे आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित करावा लागला. आयपीएलच्या या पर्वाला 9 एप्रिलपासून सुरुवात झाली. तर अखेरचा सामना 2 मे ला खेळवण्यात आला. या हंगामात एकूण 60 पैकी 29 सामने खेळवण्यात आले. स्पर्धा स्थगित केल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. पण या स्थगितीमुळे काही खेळाडूंनी सुटकेचा निश्वास घेतला असेल. या खेळाडूंना या मोसमात आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी आली नाही. तसेच फार संघर्ष करावा लागला. या खेळाडूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
2/6
David Warner, Eoin Morgan, hardik pandya, IPL 2021, Nicholas Pooran, Ipl, Cricekt, Corona, Covid 19,
शार्दुल ठाकुर- चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज. शार्दुलसाठी हा मोसम फार विशेष राहिला नाही. शार्दुलला त्याच्या गोलंदाजीने कमाल करता आली नाही. त्याने खेळलेल्या 7 सामन्यात 10.33 च्या इकॉनॉमी रेटने केवळ 5 विकेट्स घेतल्या. म्हणजेत शार्दुलने टाकलेल्या प्रत्येक ओव्हरमध्ये 10 पेक्षा अधिक धावा लुटल्या. शार्दुलने 2 वेळा 50 पेक्षा अधिक धावा दिल्या.
3/6
David Warner, Eoin Morgan, hardik pandya, IPL 2021, Nicholas Pooran, Ipl, Cricekt, Corona, Covid 19,
निकोलस पूरन- वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज. पूरनसाठी हा मोसम वाईट स्वप्नासारखा होता. त्याने या मोसमात एकूण 7 सामने खेळले. त्यापैकी 4 वेळा तो शून्यावर बाद झाला. विशेष म्हणजे पूरन वेगवेगळ्या सामन्यात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर धावा न करता बाद झाला. त्यामुळे त्याच्या नावे नकोसा विक्रम झाला. पूरनला एकूण 7 सामन्यात केवळ 28 धावाच करता आल्या. त्यामुळे पूरनला 8 व्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात आले नाही.
4/6
David Warner, Eoin Morgan, hardik pandya, IPL 2021, Nicholas Pooran, Ipl, Cricekt, Corona, Covid 19,
हार्दिक पंड्या- मुंबई इंडियन्सचा ऑलराउंडर खेळाडू. मात्र हार्दिकला या मोसमात कमाल करता आली नाही. हार्दिकने 7 सामन्यात 118.18 च्या स्ट्राइक रेटने केवळ 52 धावा केल्या. हार्दिकला धावांसाठी खूप संघर्ष करावा लागला. तसेच खांद्याच्या दुखापतीमुळे हार्दिकला गोलंदाजी करता आली नाही.
5/6
David Warner, Eoin Morgan, hardik pandya, IPL 2021, Nicholas Pooran, Ipl, Cricekt, Corona, Covid 19,
डेव्हिड वॉर्नर- सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार. डेव्हिडसाठी हा 14 वा हंगाम निराशाजनक राहिला. वॉर्नरला एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागला. तसेच दुसऱ्या बाजूने त्याला कोणत्याही खेळाडूने साथ दिली नाही. त्यामुळे हैदराबादला 6 पैकी 5 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. वॉर्नरला नेतृत्वाची जबाबदारी नीट सांभाळता न आल्याने त्याची उचलबांगडी करण्यात आली. त्याऐवजी केन विलियमसनला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. मात्र त्यानंतर कहर झाला. वॉर्नरला संघातून (प्लेइंग इलेव्हन) वगळण्यात आले. या सर्व अपमानास्पद प्रकारामुळे वॉर्नर हा मोसम विसरण्याचं प्रयत्नात असेल.
6/6
David Warner, Eoin Morgan, hardik pandya, IPL 2021, Nicholas Pooran, Ipl, Cricekt, Corona, Covid 19,
ऑएन मॉर्गन- कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार. मॉर्गनला या पर्वात चमकदार कामगिरी करता आली नाही. मॉर्गनने 7 सामन्यात 92 धावा केल्या. मॉर्गनने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात 47 धावांची खेळी केली. त्याला यासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र मॉर्गनला फंलदाजीसह नेतृत्व या दोन्ही बाबतीत आपली छाप सोडता आली नाही.