PHOTO : कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या विजयाचे बॅनर

विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या स्पष्ट होतील. मात्र, मतमोजणीपूर्वीच कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या विजयाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:51 PM, 23 Oct 2019
1/5
विधानसभा सभा निवडणुकांच्या निकालाची राज्यातील प्रत्येकाला उत्सुकता लागून आहे. उद्या (24 ऑक्टोबर) मतमोजणीनंतर 288 मतदारसंघात कोण विजयी होणार हे कळणार आहे. मात्र, राष्ट्रवादीला निकालाआधीच अतिघाई झाल्याचं चित्र आहे.
2/5
विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या स्पष्ट होतील. मात्र, मतमोजणीपूर्वीच कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या विजयाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
3/5
रोहितदादा पवार याचं प्रचंड मतांनी विजय झाल्याबद्दल अभिनंदन, असा मजकूर या फलकांवर लिहिलेला आहे. या फलकावर रोहित पवार यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. त्याशिवाय, या फलकावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचेही फोटो लावण्यात आले आहेत.
4/5
कर्जत-जामखेडमध्ये प्रमुख ठिकाणी हे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे हे फलक रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
5/5
कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार आणि भाजपचे नेते राम शिंदे यांच्यात सरळ लढत आहे. रोहित पवारांसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी जाहीर सभा घेतल्या. राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.