Photo : हर्षवर्धन जाधव ज्यांना जोडीदार म्हणून सांगतायत, त्या ईशा झा कोण आहेत?

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत सातत्याने दिसणाऱ्या ईशा झा कोण आहेत?

Mar 11, 2021 | 11:46 PM
सागर जोशी

|

Mar 11, 2021 | 11:46 PM

ईशा झा या सध्या कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे चर्चेत आल्या आहेत. मराठा आंदोलनावेळी हर्षवर्धन जाधव यांनी जी युवा मन परिवर्तन यात्रा काढली होती. त्या यात्रेतही मराठवाडा दौऱ्यावर जाधव यांच्यासोबत ईशा झा दिसून आल्या होत्या.

1 / 5
मात्र ईशा झा या ठळकपणे समोर दिसून आल्या त्या पुण्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर. तेव्हापासून ईशा झा या हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत प्रत्येक राजकीय कार्यक्रमात, बैठकीत दिसत आहेत.

2 / 5
काही दिवसांपूर्वी कन्नड इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात हर्षवर्धन जाधव यांच्या मातोश्री आणि माजी आमदार तेजस्विनी जाधव आणि स्वत: हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या भाषणात ईशा यांचा उल्लेख केला आणि जनतेला त्यांची ओळख करुन दिली.

3 / 5
ईशा झा या मुळच्या बिहारच्या असल्याचं सांगितलं जातं. पण त्या वाढल्या मुंबईतच. त्याचं शिक्षण एमएस क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये झालं आहे. त्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत. पुण्यात त्या माईंड ओशन नावाचं क्लिनिक चालवतात. पुण्यात ईशा झा यांची प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ म्हणून ओळख आहे. तसंच क्रोध व्यवस्थापनातही त्यांचं मोठं नाव आहे.

4 / 5
आतापर्यंत ईशा यांचा उल्लेख हर्षवर्धन जाधव यांच्या मैत्रिण किंवा सहकारी असाच केला जात होता. पण तेजस्विनी जाधव यांनी शेतकरी मेळाव्यातील आपल्या भाषणात त्यांना अप्रत्यक्षपणे आपल्या कुटुंबाचा सदस्य मानलं आहे. कारण, या दोघांना आशीर्वाद द्या अशी विनंतीच त्यांनी जनतेला केली होती. तर आता स्वत: हर्षवर्धन जाधव यांनी संजना नाही तर ईशा झा याच माच्या जोडीदार असल्याचं म्हटलंय.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें