PHOTOS : 24 हजारांची साडी आणि स्लीवलेस ब्लाऊजमध्ये माधुरीच्या अदा, पाहा फोटो…

अभिनेत्री माधुरी दीक्षित कायमच ट्रॅडिशनल ड्रेसेसमध्ये तिच्या चाहत्यांना धक्का देत असते. आत्ता नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

1/5
अभिनेत्री माधुरी दीक्षित कायमच ट्रॅडिशनल ड्रेसेसमध्ये तिच्या चाहत्यांना धक्का देत असते. आत्ता नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
2/5
या फोटोंमध्ये माधुरीने साध्या साडीसोबत स्लीवलेस ब्लाऊज घातलेला आहे. डिझायनर क्षितिज जलोरीने ही साडी डिझाईन केलीय. या कलरफुल स्ट्राईप्ड 6 मीटरची साडी माधुरीवर खूपच उठून दिसत आहे.
3/5
माधुरीच्या या साडीत क्रीप फॅब्रिकचा वापर केलेला आहे. या साडीला ब्रुकलिन रेड साडी असं नाव देण्यात आलंय. या साडीसोबत तिने टरक्वीज ब्लू स्लीवलेस हॉल्टर नेकचा ब्लाऊज घातला आहे.
4/5
या लुकला अधिक आकर्षक करण्यासाठी माधुरीने मोती आणि स्टोनचं नेकलेसही घातलंय. याशिवाय हातात सिल्वर कलरचं ब्रासलेटही दिसत आहे. ते या साडीसोबतही मॅच होत आहे.
5/5
माधुरीची ही साडी तुम्हाला आवडली असेल तर क्षितिज जलोरीच्या या ब्रुकलिन रेड सा़डीसाठी तुम्हाला 24, 800 रुपये खर्च करावे लागतील.