Marathi News » Photo gallery » Pimpri chinchwad night curfew police in action mode against the people who violate the rule
PHOTO | पिंपरी-चिंचवडमध्ये संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन, नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद
अनेक नागरिक रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास घराबाहेर आढळून आले. नागरिकांच्या घराबाहेर पडण्याचं कारण काय? याची पहिल्यांदा पोलिसांनी चौकशी केली (Pimpri Chinchwad Night Curfew).
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीची घोषणा केली आहे. शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असणार आहे.
1 / 7
काल रात्री (सोमवार 22 फेब्रुवारी) या संचारबंदीचा पहिलाच दिवस होता. त्यानुसार पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी केली असून पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.
2 / 7
संचारबंदीच उल्लंघण करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडुके उगारात अनेकांना पहिल्याच दिवशी लाठीचा प्रसाद दिल्याचं पाहायला मिळालं.
3 / 7
शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. रात्री घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलीस चौकशी करत होते.
4 / 7
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
5 / 7
अनेक नागरिक रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास घराबाहेर आढळून आले. नागरिकांच्या घराबाहेर पडण्याचं कारण काय? याची पहिल्यांदा चौकशी केली. जे नागरिक कामाशिवाय घराबाहेर पडले त्यांना पोलिसांनी नियम समजावून सांगितले.
6 / 7
काही ठिकाणी पोलिसांनी नागरिकांचं प्रबोधन केलं. तर काही ठिकाणी आगाऊ लोकांना पोलिसांनी आपल्या लाठीचा प्रसादही दिला. मास्क न वापरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करत आर्थिक दंड वसूल केला.