AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM मोदी यांनी घानाच्या राष्ट्रपती-स्पीकर यांना दिले खास गिफ्ट, भारतीय कला-संस्कृतीशी खास संबंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना देशाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घानाचे राष्ट्रपती जॉन महामा यांना कर्नाटकच्या प्रसिद्ध बिद्री कलेचा वारसा असलेली फुलदाणी भेट दिली आहे. तर त्यांची पत्नी लॉर्डीना महामा यांना ओदीशाची कलाकुसर असलेली पर्स भेट दिली आहे. तसेच संसदेचे अध्यक्ष अल्बान बागबिन यांना बंगालचा कलात्मक अंबावारी हत्तीची प्रतिमा भेट दिली आहे. या भेट वस्तू भारताच्या समृद्ध केलेचा वारसा आणि हस्तकलेचे सौदर्य प्रतिबिंबित करते.

| Updated on: Jul 03, 2025 | 7:26 PM
Share
Gift to President of Ghana -  कर्नाटकातील बिडर येथील बिद्रीवेअर फुलदाण्यांची जोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घानाचे राष्ट्राध्यक्षांना भेट दिली आहे. ही फुलदाणी भारतातील प्रसिद्ध धातूच्या कलाकृतीची साक्ष आहे. आकर्षक काळ्या फिनिश आणि उत्तम चांदीच्या घडणावळीसाठी ओळखली जाते.शतकानुशतके जुन्या तंत्राचा वापर करून कुशल कारागिरांनी हातांनी तयार केलेल्या या फुलदाण्या जस्त-तांब्याच्या मिश्रधातूपासून बनवल्या जातात.कर्नाटकातील समृद्ध हस्तकलेचा वारसा म्हणून ही भेट पंतप्रधानांनी दिली आहे.

1 / 4
घानाच्या सभापतींना भेट - Miniature Elephant Ambawari - लघु हत्ती अंबावारी - पश्चिम बंगालमध्ये हस्तनिर्मित ही कोरीव हत्ती अंबावारी पंतप्रधानांनी घानाच्या सभापतींना भेट दिली आहे. राजेशाही परंपरा आणि भारताच्या समृद्ध कलात्मक वारशाचे प्रतीक म्हणून हे हत्तीच्या अंबावरीचे शिल्प भेट देण्यात आले  आहे. ही कलाकृती पॉलिश केलेल्या कृत्रिम हस्तिदंतापासून बनवली आहे.नैसर्गिक हस्तिदंताला पर्याय म्हणून याकडे पाहीले जाते. यावर फुलांच्या आकृत्या कोरल्या आहेत. काचेच्या बॉक्समध्ये ही सजावट ठेवली आहे.

2 / 4
घानाच्या उपराष्ट्रपतींना भेट, काश्मीरी पश्मीना शाल - काश्मीरमधील  ही आलिशान पश्मीना शाल घानाच्या उपराष्ट्रपतींना भेट देण्यात आली आहे. ती  कलात्मकता आणि सुंदरतेचा मिलाफ आहे. मऊपणा, उबदारपणा आणि हलक्या वजनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शालमध्ये काश्मिरी वारशाचे प्रतिक असून अत्यंत नाजुक हाताने त्यांचे भरतकाम केलेले आहे. फुलांच्या आणि पैस्ली आकृतीबंधांचा डिझाईनसाठी वापर झाला आहे.

3 / 4
घानाच्या राष्ट्रपतींच्या पत्नीला भेट - चांदीची फिलीग्री वर्क पर्स - घानाच्या राष्ट्रपतीच्या पत्नींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ओडिशाच्या कटक येथील ही सुंदर सिल्व्हर फिलीग्री वर्क पर्स भेट दिली आहे. या प्रदेशातील प्रसिद्ध तारकासी हस्तकलेचे एक अद्भुत उदाहरण आहे. ५०० वर्षांहून अधिक काळ ही कलाकुसुर केली जात असून तिला चांदीची फिलीग्री म्हणतात.अत्यंत कुशल कारागिरांनी काळजीपूर्वक हातांनी ती बनविली आहे. त्यात बारीक चांदीच्या तारांपासून बनवलेले नाजूक फुलांचे आणि द्राक्षांचे आकृतिबंध आहेत.ही पर्स ओडिशाच्या समृद्ध हस्तकला परंपरेचा एक वारसा आहे.

4 / 4
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.