Marathi News » Photo gallery » PM narendra modi send 100 pairs of chappal made from jute to kashi vishwanath dham workers
PM Narendra Modi | काशी विश्वनाथ मंदिरातील कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनोखी भेट, दिलं ‘हे’ खास गिफ्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात येताच त्यांनी ज्यूपासून तयार केलेले तब्बल 100 चपलांचे जोड मागवले. तसेच अधिकाऱ्यांमार्फत काशी विश्वनाथ धाम येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याचे वाटप केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ धाम येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चप्पल भेट म्हणून दिली. मोदी यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांना तब्बल ज्यूटपासून तयार केलेले 100 चप्पल भेट म्हणून दिले.
1 / 5
मंदिर परिसरात लेदर तसेच रबरापासून बनवलेल्या चपलांना घालण्यास मनाई आहे. याच कारणामुळे येथे काम करणारे सर्व कर्मचारी तसेच पुजारी विना चपलांचे असतात. थंडीच्या कडाक्यात ते चपलेविना मंदिराची निगा राखतात.
2 / 5
ही बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात येताच त्यांनी ज्यूपासून तयार केलेले तब्बल 100 चपलांचे जोड मागवले. तसेच अधिकाऱ्यांमार्फत काशी विश्वनाथ धाम येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याचे वाटप केले.
3 / 5
पुजारी, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, तसेच इतर सेवा करणाऱ्या अशा सर्वांनाच यावेळी लेदर तसेच रबररहित चप्पल भेट म्हणून देण्यात आली. हे चप्प्ल ज्यूटपासून तयार करण्यात आले आहेत.
4 / 5
सध्याच्या कडाक्याच्या थंडीमध्ये मंदिर परिसरातील कर्मचारी तसेच इतर कामगारांना त्रास होऊ नये म्हणून मोदींनी हे पाऊल उचलले. त्यांच्या भेटीनंतर मंदिर परिसरातील कर्मचाऱ्यांनी मोदींचे आभार मानले आहेत