मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एकत्र, राज्याचे नवे लोकायुक्त नेमके कोण?

महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामध्ये विविध मुद्यांवरुन वादाचे प्रसंग घडत असतात. मात्र, लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या शपथविधीच्या निमित्तानं सर्वजण एकत्र आल्याचं पाहायला मिळाले.

1/5
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेले पाहायला मिळाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

2/5
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांना लोकायुक्त पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

3/5
निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा आज सकाळी राजभवन येथे राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथविधी झाला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.

4/5
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून लोकायुक्तांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही.एम. कानडे यांची नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली होती. आज त्यांचा शपथविधी झाला.

5/5
लोकायुक्त हे वॉचडॉगसारखे काम करतात आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यात आणि पारदर्शकता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मागील लोकायुक्त, (निवृत्त) न्यायमूर्ती एमएल तहलियानी यांनी ऑगस्ट 2020 मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण केला होता. लोकायुक्त नसल्याने जवळपास एक वर्ष झाल्यानंतर  महाराष्ट्राला नवीन लोकायुक्त मिळाले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI