Photo : राज्यभरात राज ठाकरेंच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस पार पडला आहे, त्यानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. (Raj Thackeray's birthday celebrations across the state, public events organized)

1/10
Raj Thackeray Birthday
14 जून 2016 ला राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घोटीच्या न्हायडी डोंगराच्या पायथ्याशी सॅमसोनाइट कंपनीच्या मदतीनं राजसैनिकांनी 490 विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची लागवड केली होती. आज पुन्हा मनसेकडून मा. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या 490 वृक्षांची सजावट करून पूजा केली आणि दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून त्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
2/10
Raj Thackeray Birthday
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा आज 53 वा वाढदिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
3/10
Raj Thackeray Birthday
मुंबईतील बोरीवली येथील नॅशनल पार्क मध्ये आदिवासी पाड्यातील मुलांमध्ये जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी 53 किलो वजनाचा केक कापून राज ठाकरे यांचा 53वां वाढदिवस साजरा केला.
4/10
Raj Thackeray Birthday
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज ठाण्यातील मनसे नेता महेश कदम यांनी ठाणेकरांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. वाढदिवसानिमित्त प्रत्येक लिटरवर 53 रुपयांची सूट दिली.
5/10
Raj Thackeray Birthday
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त माजलगाव मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
6/10
Raj Thackeray Birthday
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील चेंबूरमध्ये पन्नास रुपयांचं कुपन वाटप करण्यात आलं. पेट्रोल पंपावर कुपन घेण्यासाठी बाईक स्वारांची लांबचा लांब रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या.
7/10
Raj Thackeray Birthday
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त, वसईच्या सत्पाला येथील वृधश्रमात असणाऱ्या राज ठाकरे यांच्या शिक्षिका सुमनताई यांच्या हस्ते केक कापून मनसे सैनिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी वृद्धाश्रमातील आजींनी डान्स करत आपला आनंद ही व्यक्त केला आहे.
8/10
Raj Thackeray Birthday
अनेक ठिकाणी पेट्रोल दरात सवलत देण्यात आली.
9/10
Raj Thackeray Birthday
काही ठिकाणी प्रती लिटर दरात 10 रुपयांची सुट देण्यात आली.
10/10
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य माणसाचा रोजगार गेल्यानं त्यांचं जगणं कठीण झालं आहे. अशा गरजूंना दोन वेळच जेवण मिळावं यासाठी मनसे प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनीष डांगे व कार्यकर्त्यांच्या वतीनं मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त सामान्य जनतेला 200 किराणा किटचं वाटप करण्यात आलं.