Photo |भाजपचे जेष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींचे 94 व्या वर्षात पदार्पण

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी यांचा आज 94 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला

1/5
लालकृष्ण अडवाणी यांनी 1980 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाची स्थापना केली व पक्षाचे सरचिटणीस बनले. 1986 मध्ये त्यांची भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली. 1989 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली 86 जागा जिंकून भाजप दुसरा सर्वात मोठा संसदीय पक्ष म्हणून उदयास आला.

2/5
2008 मध्ये, त्यांनी "माय कंट्री, माय लाइफ" नावाचे आत्मचरित्र लिहिले. या आत्मचित्राचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले होते .  हे आत्मचरित्राचे हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि उर्दूमध्ये अनुवादन  झाले आहे .

3/5
लालकृष्ण अडवाणींना किशोरवयापासूनच पुस्तकांची प्रचंड आवड  निर्माण झाली. के एम मुन्शी, एस आर राधाकृष्णन, सी राजगोपालाचारी, एल्विन टॉफलर, दुर्गा दास बसू या लेखकांच्या पुस्तकांचे अडवाणी खूप चाहते आहेत.

4/5
आदरणीय अडवाणीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो. लोकांचे सक्षमीकरण आणि आपला सांस्कृतिक अभिमान वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक प्रयत्नांसाठी देश त्यांचा  ऋणी राहील. असे ट्विट करत  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडवाणींना   शुभेच्छा दिल्या.

5/5
राममंदिर आंदोलनामुळे अडवाणी देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले होते, त्यांना संघ परिवाराचाही आशीर्वाद होता. असे असतानाही त्यांनी 1995 मध्ये वाजपेयींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते.

Published On - 1:19 pm, Mon, 8 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI