IPL इतिहासातली युवा कर्णधारांची संपूर्ण लिस्ट, रिषभ पंतकडे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी!

सिनिअर खेळाडूंना बाजूला सारत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी युवा खेळाडू रिषभ पंतच्या नावाची घोषणा झाली आहे. यासह पंत आयपीएलच्या इतिहासातील 5 वा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. | Rishabh IPL 2021

1/7
Rishabh pant
सिनिअर खेळाडूंना बाजूला सारत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी युवा खेळाडू रिषभ पंतच्या नावाची घोषणा झाली आहे. यासह पंत आयपीएलच्या इतिहासातील 5 वा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे.
2/7
Rishabh Pant
रिषभला वयाच्या 23 वर्षे आणि 6 महिन्यांचा असताना दिल्लीचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
3/7
Shreyas Iyer
श्रेयस अय्यरने 23 वर्षे आणि 4 महिन्यांचा असताना दिल्लीचं नेतृत्व केलं होतं. आयपीएलच्या इतिहासातील तो चौथा सर्वांत तरुण कर्णधार आहे.
4/7
suresh Raina
सुरेश रैना 23 वर्ष आणि 3 महिन्यांचा असताना पहिल्यांदा कर्णधार बनला. आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वांत तरुण कर्णधार बनण्याचा विक्रम रैनाच्या नावावर आहे.
5/7
Steve Smith
स्टीव स्मिथला वयाच्या 22 वर्ष आणि 11 महिन्यांचा असताना कप्तानी करण्याची संधी मिळाली. आयपीएल इतिहासातील स्मिथ दुसऱ्या नंबरचा युवा कप्तान आहे.
6/7
virat Kohli IPL
IPL च्या इतिहासात सर्वाधिक तरुण कर्णधाराचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटला 22 वर्ष आणि 6 महिन्यांचा असताना बंगळुरुने कर्णधार केलं होतं.
7/7
Rohit Sharma MI
सर्वात युवा कर्णधारांच्या यादीत रिषभ पंत 5 व्या क्रमांकावर आहे. त्याच्याकडे सर्वात कमी वयात आयपीएल करंडक जिंकणाऱ्या रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. रोहित शर्माने वयाच्या 26 वर्ष 27 दिवसांचा असताना त्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं.