दुर्मिळ समजल्या जाणारा पिवळा पळस सध्या माहूरमध्ये पर्यटकांचे लक्ष वेधून घेतोय. माहूर तालुक्यातील वडसा गावाजवळ रस्त्याच्या लगत हा पिवळा पळस फुललेला दिसतोय. दुर्मिळ पिवळ्या पळसफुलांचे आयुर्वेदशास्त्रात औषधी महत्व खूप आहे.
1 / 6
सर्वसाधारणपणे पळस हा लाल, केशरी रंगाचा असतो, मात्र पिवळा पळस हा दुर्मिळ मानल्या जातो. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या या पिवळ्या पळसाला पाहण्यासाठी लोक गर्दी करतायेत.
2 / 6
विदर्भातील वाशिममधील मंगरुळपिर तालुक्यातील वनोजा शिवारात व अमरावती जिल्हात मोर्शी तालुक्यात विचोरी दाभेरी शिवारात दुर्मिळ पिवळा पळस असल्याची नोंद असुन, वाशिम आणि अमरावतीनंतर आता पिवळा पळस नांदेड जिल्हातील माहूर येथे सापडला आहे.
3 / 6
वसंत ऋतूच्या आगमणाची चाहुल लागते लाल केशरी पळसाच्या फुलानी, रखरखत्या उन्हातही निसर्गाचे सौंदर्य या फुलांमुळे अधिक खुलुन दिसते.
4 / 6
रंगपंचमी जवळ आली की, आठवण होते की, पळसच्या फुलांची केसरी आणि लाल पळसची फुले सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, माहूर तालुक्यातील वडसा गावाजवळ आलेली ही फुले अत्यंत दुर्मिळ आहेत.
5 / 6
सह्याद्रीच्या पर्वतरांगात जैवविविधतेने नटलेल्या माहूर तालुक्यातील डोंगरदऱ्यात अशा विविध दुर्मिळ वनस्पती आढळतात.