AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी कलाकारांकडून पंढरपुरात 25 तास अविरत भजन; ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंद

विठ्ठलाची भक्त असलेली सावली तिच्या जीवनाची वाट कशी शोधेल, याची कथा ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत पहायला मिळेल. येत्या 23 सप्टेंबरपासून दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Updated on: Sep 14, 2024 | 12:53 PM
Share
झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ असं या मालिकेचं नाव असून त्यात सावली या आळंदीमध्ये राहणाऱ्या,  रंग रूपाने साधारण पण गुणांनी असाधारण असणाऱ्या मुलीची कथा दाखवण्यात येणार आहे.

1 / 6
सावलीला दैवी सुरांची देणगी लाभलेली आहे. वडील एकनाथ आणि आई कान्हू यांच्याप्रमाणेच सावलीचीही पांडुरंगावर अपार श्रद्धा आहे. विठ्ठलाच्या सावलीत तिने श्वास घेतला, त्यामुळे एकनाथने तिचं नाव सावली ठेवलंय. तिच्या आयुष्यात त्याचं स्थान अनन्यसाधारण महत्त्व आहे.

2 / 6
या मालिकेच्या कलाकार आणि निर्मात्यांनी प्रमोशनच्या निमित्ताने पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली आणि विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. विठ्ठलाला आवडणाऱ्या तुळशीच्या पानांनी मंदिराला अप्रतिम सजावट केली होती. या ऐतिहासिक मंदिरातील केलेली ही सजावट मंदिरात उपस्थित असलेल्या भक्तांचं लक्ष वेधून घेत होती.

3 / 6
हेच अध्यात्मिक वातावरण वाढवण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांसाठी एक अविस्मरणीय अनुभव म्हणून पंढरपुरातील आणि आसपासच्या भजनीमंडळांद्वारे 25 तास अखंड भजन सेवा विठ्ठलचरणी सादर केली. या उपक्रमाची दखल ‘वर्ल्ड  रेकॉर्डस्  बुक ऑफ इंडिया’नेही घेतली.

4 / 6
हा उपक्रम सर्वांच्या मनात खोलवर रुजला. प्राप्ती रेडकर आणि साईंकित कामत यांच्या उपस्थितीने उपस्थित प्रेक्षक आणि पत्रकारांचा उत्साह वाढवला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांनी मालिकेबद्दल चर्चा केली आणि पंढरपूरचा अनुभव सांगितला.

5 / 6
या मालिकेत सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, गौरी किरण यांच्याही भूमिका आहेत. या मालिकेचं अजून एक विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे या मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे एका मत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. कोठारे व्हिजनची ही मालिका असून महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे या मालिकेचे निर्माते आहेत.

6 / 6
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.